अहमदनगर उड्डाणपूलचे काम प्रगतीपथावर ; दि. 25 ऑगस्ट ते दि.८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सक्करचौक ते कोठीचौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंदी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – शहरातील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. सक्करचौक ते चांदणीचौक दरम्यान लॉन्चिंग गर्डरचे काम करायचे आहे. हे काम चालू असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळेच दि. 25 ऑगस्ट ते दि.८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत सक्करचौक ते कोठीचौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे.
स्टेशन रस्त्यावर सुमारे 87 मोठे सिमेंटचे काम करून पूर्ण होत आले आहे. त्यावर आता सिमेंट प्लांट टाकून रस्ता तयार केला जाणार आहे. हे काम येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 15 दिवसासाठी रात्रीवेळी ६ तास या रस्त्यावरील सर्व वाहतूक बंद असणार आहे.
केंद्र सरकारने दिलेले सुमारे पावणे तीनशे कोटी रुपये व महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले 52 कोटी अशा सुमारे सव्वा चारशे कोटी रुपये खर्च खर्चातून स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौक ते जीपीओ चौकापर्यंतच्या तीन किलोमीटर अंतरात हा उड्डाणपूल होणार आहे. सुमारे सात ते आठ महिन्यापासून त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या मधोमध सिमेंटचे खांब उभारण्यात आले आहेत. सुमारे 80 च्या वर हे खांब असून त्याची उभारणी जवळपास पूर्ण होत आलेली आहे. या खांबावर आता सिमेंटच्या मजबूत प्लांट टाकल्या जाणार असून या फाउंडेशनवर रस्ता केला जाणार आहे. या कामाला आता सुरुवात होणार असून तीन किलोमीटर अंतराच्या या कामासाठी सुमारे सहा महिने अवधी लागणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
👉पंधरा दिवस रात्री वाहतूक बंद
नगर शहरातील सक्करचौक ते जीपीओ चौका दरम्यान होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सलग पंधरा दिवस मध्यरात्री सहा तास सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. दि.२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत सक्करचौक ते कोठीचौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.
उड्डाणपुलाच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे. नगर शहरातील सक्करचौक ते जीपीओचौक यादरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे.  त्या अनुषंगाने सक्करचौक ते चांदणीचौक दरम्यान लॉन्चिंग गर्डरचे काम करायचे आहे. हे काम चालू असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात तसेच उड्डाणपुलाचे काम दि.२ सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार असल्याचे दिनेश अग्रवाल इन्फ्राकाॅन कंपनीने सांगितले आहे.
👉अवजड वाहतूक बंद 📥
उड्डाण पुलाच्या कामासाठी 15 दिवस रात्री स्टेशन रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात येत असताना या काळात तसेच अन्य वेळी ही अवजड वाहतूक शहरातून जाऊ नये म्हणून हॉटेल यश पॅलेस कोठी चौक तसेच कल्याण रोडवरील नेप्ती नाका येथून दिल्लीगेट कडे येणाऱ्या रोडवर व पत्रकार चौक येथे आपत्ती चौकाकडे जाणाऱ्या रोडवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील इतक्या उंचीचे फाईट बॅरीअर बसवण्यात येणार आहेत.
👉वाहतुकीत बदल असा
दि. 25 ऑगस्ट ते दि.८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत सक्करचौक ते कोठीचौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. अहमदनगर कडून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास – शासकीय दुध डेअरीचौक – विळद बायपास – निंबळक बायपास – कांदा मार्केट रोड – केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहे.
👉पुण्याकडून मनमाड औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास- निंबळक- विळद- शासकीय दुध डेअरी चौक- शेंडी बायपास मार्गे वळविण्यात येणार आहे.
👉बीड, जामखेड, पाथर्डीकडे जाणारी येणाऱ्या अवजड वाहतुकीत बदल केला आहे. पुण्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी केडगाव बायपास- अरणगाव- वाळूंज -मुठ्ठी चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
👉मनमाड औरंगाबादकडून येणाऱ्या वाहनांसाठी विळद बायपास – शासकीय दुध डेअरी – शेंडी -एसपीचौक- चांदणीचौक- मुठ्ठीचौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
👉मनमाड, औरंगाबादकडून येणाऱ्या वाहनांसाठी विळद बायपास- शासकीय दुध डेअरी- शेंडी – एसपीचौक- चांदणीचौक- मुठ्ठीचौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
👉पुणे, अहमदनगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्‍या वाहनांसाठी मार्ग बदलला आहे. यामध्ये सक्करचौक -आनंदऋषी हॉस्पिटल- महात्मा फुले चौक – कोठी आणि सक्कर चौकी येथून टिळकरोड- आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर – नेप्ती नाका -दिल्ली गेट – अप्पूहात्ती चौक – पत्रकारचौक –  एसपीओचौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!