संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शहरातील पटवर्धन चौकानजिक भारत – पाकिस्तान क्रिकेट T २० मॅचवर सट्टा खेळविणा-यास रंगेहाथ कोतवाली पोलीसांनी एकास रविवारी पकडले.अमित सुभाषलाल गांधी (वय ४२, रा कोर्टगल्ली अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव असून, यातील एकजण फरार झाला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रविंद्र पिंगळे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोकाँ अमोल गाढे, पोकॉ सुजय हिवाळे, पोकाॅ संदिप थोरात, पोकाँ सोमनाथ राऊत आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
रविवारी (दि २३) दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाण्याचे सपोनि रविद्र पिंगळे यांना माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकातील मनोहर वाईन्स समोरील गाळ्याजवळ मोबाईलवर ‘भारत-पाकिस्तान 1 २० क्रिकेट मँच’ वर सट्टा लावणारा व खेळवीणारा एकजण बसलेला आहे, अशी माहीती मिळाली. ५.४५ वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह त्या ठिकाणी जावून त्याच्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी अमित सुभाषलाल गांधी (वय ४२, रा कोर्टगल्ली अहमदनगर) हा मिळुन आला. त्याच्याकडे T २० मँच वर सट्टा लावणे करीता वापरत असलेले दोन मोबाईल फोन मिळून आले. त्याने त्याव्दारे काही लोकांना सट्टा खेळणे करीता लागणारे पासवर्ड व युजर आयडी पुरवल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, त्यास आयडी व पासवर्ड पुरविणारा परेश मुनोत हा असल्याचे निष्पन्न झाले. सद्या तो फरार आहे. दोन्ही आरोपी हे सट्टा खेळताना व खेळविताना मिळून आले. याबाबत पोकाॅ अमोल गाढे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं I ८३९ / २०२२ महा. जुगार कायदा कलमांतर्गत गुन्हा रजि दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना योगेश खामकर हे करीत आहेत.