संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर– शहरातील सक्करचौकात ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवणा-या व मराठा आरक्षण नाकारणा-या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी माजीमंञी प्रा.राम शिंदे, खा. डाॅ.सुजय विखे पा. माजीमंञी शिवाजी कर्डीले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड आदींसह नगर शहरासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.