संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मीडियात काही कालावधीपासून अवास्तव पञकारांकडून वास्तव पञकारांबाबत शासकीय अधिका-यांना वास्तव पञकारांबाबत चुकीची माहिती जाणून-बुजून पुरवली जाते. या कारणातून शासकीय अधिका-यांकडून वास्तव पञकारांना माहिती देण्याबाबत दुजाभाव केला जातो. यात संकोचित अवास्तव पञकार यांनी मोठ्या प्रमाणात वास्तव पञकारांबाबत चुकीची माहिती पसरविण्याची जणू सुपारी घेतली आहे की काय ? , असे चित्र सध्यातरी पाहण्यास मिळत आहे. परंतु शासकीय अधिका-यांनी कोणी अवास्तव पञकार हा संबंधित वास्तव पञकारांबाबत चुकीची माहिती देत असल्यास ती माहिती अवास्तव पञकार का देत आहे. याबाबत शोध घेऊन त्या मी पञकार म्हणणा-यांचे व्हिरीफीक्शन व्हावे, ते संबंधित शासकीय अधिकारी अथवा राजकीय मंडळीनी आपआपल्या स्तरावर केले पाहिजे. यातून वास्तव पञकारांबाबत गैरसमज दूर होण्यास मदत होईलच, परंतु अवास्तव पञकारांची नेमकी काय षडयंत्र चालले आहेत, याचा उलगडा होईल, असे मत वास्तव पञकारांचे आले आहे.
प्रत्येक पत्रकारास पत्रकारितेत येण्यामागे एक पार्श्वभूमी असते ती अधिकाऱ्यांनी तपासली पाहिजे नाहीतर चुकीचे वर्तन असणारा ‘अवास्तव पत्रकार’ संपर्कात येऊन भविष्यात त्याचा त्रास झाल्या शिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असो. अधिकारी व वास्तव पत्रकार यांच्यामध्ये माहितीची देवाण-घेवाण असते चुकीचे वर्तन घडल्यास अथवा चांगली कामगिरी केल्यास वास्तव पत्रकारांकडून लेखणीच्या माध्यमातून समाजापुढे मांडले जाते अथवा चित्रीकरणातून ते दाखवले जाते. पत्रकार उगाच कुणाही बाबत चुकीची माहिती देत नाही, अथवा ऐकून घेत नाही. पण सध्या वास्तव पत्रकारांना जिल्हा परिषद पोलीस ठाणे यासह अन्य शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नाही. हे केवळ ‘अवास्तव पत्रकारां’नी वास्तव पत्रकाराबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना चुकीची माहिती दिली अथवा पसरविल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच ‘अवास्तव पञकार’ या महाशयांची यापुढील काळात प्रत्येक शासकीय कार्यालये अथवा पोलिस ठाण्यामध्ये पार्श्वभूमी तपासावी, असेही मत वास्तव पत्रकारांचे आहे.
‘अवास्तव पञकार’ हा शासकीय अधिकारी व कर्मचारी अथवा राजकीय मंडळींना वास्तव पञकारांबाबत जाणुनबूजून चुकीची माहिती पसरवून ‘अवास्तव पञकार’ आपली तुंबडी भरण्यासाठी उद्योग करतात. पण या उद्योगाबाबत वास्तव पञकारास माहिती नसते. परंतु प्रत्यक्षात शासकीय कार्यालयात गेल्यावर वास्तव पञकारांस अनुभव येतो. यात वास्तव पञकार व अधिकारी, कर्मचा-यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. हे केवळ त्या अवास्तव पञकारांकडून दिलेल्या चुकीच्या माहिती मुळेच! या अपप्रवृत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी यात प्रामुख्याने पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पुढारी, पदाधिकारी यांनी ‘अवास्तव पञकारां’चे व्हिरीफीक्शन केले पाहिजेच !
(👉उर्वरित वास्तव पुढील भागात…)