अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणा-यावर कठोर शिक्षा व्हावी ; बाराबलुतेदार संघटना, जिल्हा नाभिक महामंडळाची मागणी


निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
नालेगाव (वाघगल्ली) येथील एका सामान्य कुटूंबातील 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अबीद मोमीन पापाभाई शेख (वय 32) याने शारीरिक अत्याचार करुन मानसिक त्रास दिला एवढेच नाही तर धर्मातरांचा आग्रह केला. याबाबत संबंधित मुलीच्या कुटूंबालाही जीवे मारण्याची धमकी दिली, यामुळे संबंधित मुलीने या मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. अशा व्यक्तीच्या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा बारा बलुतेदार महासंघाच्या नगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष माऊलीमामा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

32 वर्षाच्या व्यक्तीने 16 वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार करुन माझ्याशी लग्न करुन धर्मांतर करण्यास प्रवृत्त करतांना, या प्रकरणी संबंधित मुलीच्या कुटूंबालाही धमकावण्यात आले होते. हा प्रकार वेळोवेळी होत असून, सदर कुटूंब गरीब सामान्य मोलमजुरी करणारे असल्याने त्यांच्यावर हा काळीमा फासणारा प्रकार सहन करण्याची पाळी आली. यासर्व त्रासाला कंटाळून त्या मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणी जलदगतीने हा खटला चालविण्यात यावा, सदर आरोपीला निकाल लागेपर्यंत जामिन देवू नये. पिडीत कुटूंबाला न्याय द्यावा व पोलिस संरक्षण द्यावे, आदि मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे बाबुराव दळवी, बारा बलुतेदार शहराध्यक्ष शाम औटी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, नाभिक महामंडळ महिला जिल्हाध्यक्षा सौ.वनिता बिडवे, बारा बलुतेदार महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.छाया नवले,  ओबीसी व्हीजे एनटी शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नाभिक महामंडळ शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, बारा बलुतेदार जिल्हा कार्याध्यक्ष रमेश बिडवे, जिल्हा सचिव सुभाष बागुल, संदिप सोनवणे, साई संघर्षचे योगेश पिंपळे, संदिप वाघमारे, नाभिक महामंडळ महिला शहराध्यक्षा सौ.स्वाती पवळे, फिनिक्सचे जालिंदर बोरुडे, संतोष भालेराव, सौ.भिंगारदिवे, प्रिया नवले, सुरेखा सहाणे यासह नाभिक समाज व बारा बलुतेदार समाज बांधव उपस्थित होते.
सदर कुटूंब हे मोल मजुरी करणारे व अत्यंत गरीब परिस्थितीत हलाकीचे जीवन जगणारे आहे. तसेच मुलीने माझेशी लग्न केले नाहीतर मी तिला जिवे मारुन टाकील अशी पद्धतीने त्याने तिला व तिच्या कुटूंबियाला अनेकवेळा धमकावले यासर्व बाबीला कंटाळून मागील 10 ते 12 दिवसापूर्वी त्या मुलीने विष प्रशान केले, त्यानंतर तिला उपचारासाठी सुनिल जाधव हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे व हॉस्पिटलचे देयक ऐपत नसल्याने तिला मागिल काही दिवसांपासून सिव्हील हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते, परंतु तेथे तिचा उपचारादरम्यान दि.27 ऑक्टोबर 2021 रोजी मृत्यू झाला. घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. तसेच मुलीचे व मुलांचे दोघांचे कॉल डिटेल तपासून आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन बारा बलुतेदार व नाभिक महामंडळासह जनआधारे सामाजिक संघटना तसेच बापू ठाणगे, रामेश्वर भुकन आदिंनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!