संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
इंदूर : बाईकला स्कूटरची नंबर प्लेट असल्याने, याबाबत संबंधित गाडी मालकाने थेट पोलिसात तक्रार केली आहे. यामुळे त्या बाईकवर साराला घेऊन फिरणे अभिनेता विकी याला आता चांगलेच पडले महागात पडणार आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खानला इंदूरच्या रस्त्यांवर बाईकवर फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आहेत. परंतु, हीच गोष्ट या दोघांना आता महागात पडली आहे. विकी आणि सारा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले असताना या शहरात बाईकवर फिरत होते. मात्र, नंबर प्लेटमुळे घोळ झाला आणि त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली.
विकी ज्या बाईकच्या मागच्या सीटवर साराला बसवून फिरत होता त्याची नंबर प्लेट चुकीची निघाली आहे. ही नंबर प्लेट त्या बाईकची नसून प्रत्यक्षात एका स्कूटरची होती. नंबरच्या खऱ्या मालकाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे.
विकी आणि सारा इंदूरमध्ये लुका-छिपी-2 या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये आले होते. याच चित्रपटाचे एक सीन शूट करताना त्यांना इंदूरच्या रस्त्यावर फिरावे लागले. परंतु, खरे नंबर असलेल्या स्कूटरच्या मालकाने पोलिसांत तक्रार केल्याने अभिनेत्यांसह दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या आहेत. बनावट नंबर प्लेट वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आरटीओमध्ये सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचा तपास सध्या सुरू असून यानंतर कारवाई केली जाईल.
विकी आणि साराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्कूटर मालक जयसिंह यादव त्रस्त झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, “माझ्या एक्टिवाचा नंबर अभिनेत्यांनी शूटिंगसाठी वापरल्याची मला कल्पना देखील नव्हती. 25 मे 2018 रोजी मी एक स्कूटर घेतली होती. त्या स्कूटरला (एमपी 09 युएल 4872) हा नंबर मिळाला. त्याच नंबरचा वापर आता शूटिंगमध्ये करण्यात आला आहे. यावेळी एखादा अपघात घडला असता तर माझ्याविरुद्ध तक्रार दाखल झाली असती. त्याला कोण जबाबदार ठरले असते?”
इंदूरचे आरटीओ जितेंद्र रघुवंशी यांनी सांगितल्याप्रमाणे, अशा पद्धतीने नंबर प्लेटचा वापर करणे चुकीचे आहे. एका वाहनाचा नंबर दुसऱ्या वाहनाला इच्छा असतानाही वापरता येत नाही. वाहन मालकाची मंजुरी असल्यावर सुद्धा हे बेकायदेशीर ठरेल. यासंदर्भात तपास केल्यानंतरच कारवाई केली जाईल.