संपत्तीही जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश ; 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचे दिले आदेश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे. गुन्हे शाखेच्या अर्जाला कोर्टाने मंजुरी दिली असून, 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचे अल्टीमेटम देण्यात आले असून संपत्तीही जप्त करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
गोरेगावच्या एका प्रकरणात सिंग यांना गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते. त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आले आहे.परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप लावला होता. त्याच्या काही दिवसांपासून ते फरार आहे. त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले मात्र ते हजर राहू शकलेले नाही. त्यामुळे गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्याला न्यायालयाने मंजुरी देत, परमबीर सिंग यांना फरार घोषित केले आहे. तसेच 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचा अल्टीमेटम देखील दिला आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुंबईतील अँटेलिया प्रकरणानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर कालांतराने सिंगवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंग मे महिन्यापासून सुट्टीवर गेले असून, ते अद्यापर्यंत परतलेले नाही. ते कुठे गेले याची कल्पना त्यांच्या घरच्यांना देखील नसल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलीसांनी त्यांच्या घरी नोटीस बजावल्यानंतर देखील परमबीर सिंग हजर राहू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.