संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – भाजपाचे स्व. नेते गोपीनाथ मुंडे यांच्या २०११ सालच्या दौऱ्यावेळी विरोधकांनी कटकारस्थान रचून दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून पूर्वाश्रमी तत्कालिन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रतापकाका ढाकणे यांच्यासह ७ जणांची जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांनी निर्दोष मुक्तता केली.
२०११ साली पाथर्डी तालुका व शहरात स्व. नेते गोपीनाथ मुंडे यांचा दौरा तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष अॕड. प्रताप ढाकणे यांनी विकासकामे शुभारंभ करण्यासाठी आयोजित केला होता.या दौऱ्यात पक्षातीलच काही विरोधकांनी श्री.ढाकणे यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांविरोधात कटकारस्थान रचत वाद घातला. भादवि.कलम ३०७, ३२४, ३२६, ३२४ व आर्म ॲक्टनुसार खोटे गुन्हे पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल केले होते.
वास्तविक यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नव्हते, मात्र विरोधकांच्या सांगण्यावरून स्थानिक यंत्रणांनी विनाकारण संबंधित आरोपपत्र न्यायालयीन लढाईसाठी सादर केले. जे तब्बल ११ वर्षे चालले. त्यासंबंधी जिल्हा न्यायालयात न्यायाधीश एन.आर.नाईवाडे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली.
यामध्ये ॲड.प्रतापकाका ढाकणे, बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, अमोल विश्वनाथ बडे, अशोक शिरसाट, राजेंद्र शिरसाट, संभाजी ढाकणे व दीपक जायभाय यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
ढाकणे समर्थकांनी या निर्णयाचे शेवगाव व पाथर्डी तालुक्यात स्वागत केले. ॲड.विश्वास आठरे,ॲड.सतिष गूगळे व ॲड. रघुनाथ मुरूमकर यांनी काम पाहिले.
👉संकलन-सोमराज बडे