संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: तालुक्यातील चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीची प्रजासत्ताक दिनी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून सन २०१९ पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे, या विषयी सरपंच श्रीमती सौ प्रगतीताई बडे पा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी अवघे ग्रामपंचायत दोनच सदस्य उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांपैकी सदस्य पुरुषोत्तम रंधवे, सदस्य आजीनाथ बडे पा. या दोन सदस्यांसह ग्रामसेवक सांळुके आदिंसह ग्रामस्थ माजी सरपंच तथा युवानेते धनंजय बडे पा., प्रगतीशील शेतकरी पोपटराव बडे पा., रघुनाथ बडे पा., जगन्नाथ बडे पा. आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेत यावेळी गावांच्या विकासासाठी आलेल्या निधीसंबंधी तसेच ग्रामस्थांच्या अडीअडचणीबाबत चर्चा झाली नसल्याने उपस्थित ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर उमटला. यामुळे अन्य विषयांवर चर्चेसाठी पुढील महिन्यात ग्रामसभा घेण्याचे ठरले आहे., असे उपस्थित नागरिकांनी सांगितले. त्यामुळे चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीच्या पुढील ग्रामसभेकडे आता ग्रामस्थांसह पाथर्डी तालुक्याचे लक्ष लागले आहे.