संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात केलेल्या कारवायांमध्ये २८ वर्षापासून प्रलंबित असलेला तो जप्त करण्यात आलेला, ९९७ किलो २७४ ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा/अफु) याचा नायनाट करण्यासाठीची पोलिस प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर शनिवार (दि.२६) राजंणगांव एमआयडीसी (जि. पुणे) येथील कंपनीमध्ये त्या अंमली पदार्थाचा नायनाट करण्यात आला आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उप अधिक्षक (गृह) चे मेघश्याम डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी पूर्ण केली.
याबाबत समजलेले माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात सन १९९४ ते २०१४ पर्यंत ३२ गुन्ह्यात एकूण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजा/अफु जप्त करण्यात आला होता. गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात नियमित सुनावणी होऊन न्यायालयीन प्रक्रियापूर्ण करुन न्यायालयाने मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश दिले होते.
पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या आदेशान्वये जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपअधिक्षक (गृह) अहमदनगरचे मेघश्याम डांगे (सदस्य), स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके (सदस्य)व स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ विष्णू घोडेचोर, पोहेकॉ भाऊसाहेब कुरुंद, पोहेकॉ सखाराम मोटे, पोहेकॉ शरद बुधवंत, पोहेकॉ देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, पोकॉ जयराम जंगले, चापोहेकॉ अर्जुन बड़े व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या पथकाने कार्यवाही केली.
अहमदनगर जिल्हयातील सन १९९४ ते २०१४ पर्यंत ३२ गुन्ह्यात एकूण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजा/अफु पकडण्यात आला होता. त्या पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थ नायनाट करण्याची कार्यवाही अनेक वर्षापासून प्रलंबित होती. त्या कार्यवाहीसाठी अखेर अहमदनगर जिल्हा प्रशासनाला कायदेशीर संबंधित विभागांकडून परवानगी मिळाल्याने तो पोलिसांनी पकडण्यात आलेला अंमली पदार्थ साठा शनिवारी (दि.२६) राजंणगांव एमआयडीसी (जि. पुणे) या ठिकाणी एका कंपनीत नायनाट करण्यात आला आहे.