दि.२० फेब्रुवारीस कामास प्रारंभ होणार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- पाथर्डी तालुक्याचे नेते ॲड प्रतापकाका ढाकणे यांच्या प्रयत्नांमुळे भगवानगडसह ४६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस अखेर मुंबई मंञालयाच्या बुधवारी (दि.१५) बैठकीत मंजुरी मिळाली आहे. नामदार गुलाबराव पाटील यांनी योजनेला मंजुरी दिली असून २० फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही स्थितीत काम सुरू होणार आहे.
पाथर्डीकरांसाठी विशेषतः ही भगवानगड परिसरासाठी आनंदाची बातमी आहे.भगवानगड सह ४६ गावांच्या पाणी योजनेला पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.१५) बैठक पार पडली. या बैठकीस अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंञी हसन मुश्रीफ, मंत्री ना.शंकरराव गडाख, मंञी ना. प्राजक्त तनपुरे,पाथर्डीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड प्रतापकाका ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मा. आ. चंद्रशेखर घुले, शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितीज घुले, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे यांच्यासह पाणीपुरवठा सचिव व अधिकारी यावेळी उपस्थित होते.