👉नगराध्यक्षा उषाताई तनपुरे व युवानेते ॠषिकेश ढाकणे यांच्या हस्ते वाटप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे यांच्या विशेष प्रयत्नातून पाथर्डी तालुक्यातील १४० महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात ब्रॅडेड टेक्सोगोल्ड कं.पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम गुरुवारी (दि.२१) सकाळी ११ वा.संस्कार भवन, पाथर्डी येथे आयोजित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड प्रतापकाका ढाकणे व जिल्हा परिषद सदस्या प्रभावतीकाकी ढाकणे यांच्या उपस्थितीत राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा उषाताई तनपुरे व संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्र्वर साखर कारखान्याचे तज्ञ्ज संचालक ॠषिकेश ढाकणे यांच्या हस्ते गिरण्यांचे वाटप होणार आहे.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या अनुराधाताई कराळे, योगिताताई राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा स्वातीताई चव्हाण, पाथर्डी पंचायत समिती सदस्या शिलाताई खेडकर, पाथर्डी नगरपरिषदेच्या नगरसेविका शिलिताई खेडकर, सविताताई डोमकावळे, नगरसेविका आसिया मनियार, सविताताई भापकर, माजी नगराध्यक्षा रत्नामाला उदमले, पाथर्डी पंचायत समितीच्या मा.उपसभापती बेबीताई केळगंद्रे, मा.उपनगराध्यक्षा मनिषाताई उदमले, डाॅ.सुमनताई खेडकर, पाथर्डी नगरपरिषदेच्या नगरसेविका ज्योतीताई बोरूडे, मा.नगरसेविका वंदनाताई टेके, डाॅ. मनिषाताई देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर चिटणीस आरतीताई नि-हाळी,
राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्षा उषाताई जायभाये, पुष्पाताई गाडे, मनिषाताई ढाकणे, विजया शिरसाट, गुंफाबाई बोरूडे आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन केले आहे.