संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली– केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असतानाच नुकतीच ८ राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या राज्यपालांची नेमणूक केली आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या वृत्तांनंतर ही घोषणा करण्यात आली.
नव्या राज्यपालांची यादी
👉कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
👉मिझोरमचे राज्यपाल म्हणून हरी बाबू कंभपती यांची नियुक्ती
👉मंगुभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
👉राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
👉मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
👉हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
👉त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
👉हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.