संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – गोवंशीय जनावराच्या मांसाची वाहतूक करणारा पिकअप कोतवाली पोलिसांनी पकडून गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत पिकअप वाहनामध्ये ३ लाख रु किमतीचे लहान मोठे आकाराचे गोमांस व गोवंशीय जनावराचे हाडे असे एकूण अंदाजे १ हजार ५०० किलो वजनाचे गोमांस व हाडे तसेच २ लाख ५० हजार रु किंचा पांढ-या रंगाचा पिकअप असा एकूण ५ लाख ५० हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोसई मनोज महाजन, पोकाॅ अभय कदम, पोकाॅ अतुल काजळे, पोकाॅ कांबळे, पोकॉ अशोक सायकर आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ४ मार्च २०२३ रोजी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलीसांना माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरामधून अज्ञात व्यक्ती हा कत्तल केलेल्या गोवंश जातीचे गोमांस विक्री करण्याचे उद्देशाने वाहनातून गोमांस घेऊन जाणार आहे. ही माहिती संबंधितांनी रात्रगस्तीवर असलेले पोसई महाजन, पोकाॅ अभय कदम, पोकॉ कांबळे, पोकाॅ सायकर यांना माहिती कळवली खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोसई मनोज महाजन यांनी पथकासह झेंडीगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अशोका हॉटेलकडे जाणारे रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढ-या रंगाचा एक पिकअप ( एमएच २०.ईएल. ३४८७)हा संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोसई महाजन व पथकाने पिकअप वाहनास थांबविला. चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मिर्झा शकील बेग (वय ४५, रा. कैलासनगर, दादाकॉलनी, औरंगाबाद) असे असल्याचे सांगितले.
त्यास त्याचे गाडीमधील काय माल असल्याबाबत विचारपुस करता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली. या दरम्यान पिकअप वाहनामध्ये ३ लाख रु किमतीचे लहान मोठे आकाराचे गोमांस व गोवंशीय जनावराचे हाडे असे एकूण अंदाजे १ हजार ५०० किलो वजनाचे गोमांस व हाडे तसेच २ लाख ५० हजार रु किंचा पांढ-या रंगाचा पिकअप असा एकूण ५ लाख ५० हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुध्द पोकाॅ अतुल काजळे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुरनं २०८/२०२३ भादंवि कलम २६९, महाराष्ट्र प्राणी सरंक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(अ).(क),९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हा पोना/अब्दुलकादर परवेज इनामदार हे करीत आहेत.