३ गोमांस विक्रेत्यांवर छापा ; तोफखाना पोलीसांची कारवाई

३ गोमांस विक्रेत्यांवर छापा ; तोफखाना पोलीसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : तीन ठिकाणी गोमांस विक्रेतावर छापा टाकून ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई तोफखाना पोलीसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध शाखेचे पोउपनि. सचिन रणशेवरे , पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, पो.ना संदिप धामणे, वसिम पठाण, पो.कॉ सुमित गवळी, सतिष त्रिभुवन , शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ जानेवारी २०२४ सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि आनंद कोकरे यांना कौलारु सर्जेपुरा येथे तीन ठिकाणी वेगवेगळ्या गाळ्यामध्ये गोमांस विक्री चालू असल्याची माहिती मिळाली. पोनि श्री कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिल्याने त्यांनी कैलारु , सर्जेपुरा येथे तीन ठिकाणी छापा टाकून तनवीर सत्तार कुरेशी (वय ४०, रा.सुभेदार गल्ली, बुढान फौजदारी मस्जिदजवळ, अहमदनगर), इम्रान मोहम्मद हानीफ (वय ३२, रा.व्यापारी मोहल्ला , झेन्डीगेट, ता जि अहमदनगर), शाकीर सय्यद हारुन (वय ३५, रा. सुभेदार गल्ली, बुढान फौजदारी मस्जिदजवळ, ता जि अहमदनगर) यांच्यावर छापा टाकून त्यांच्याकडून एकूण ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल त्यात १७१ किलो गोमांस, तीन वजनी काटे, गोमांस कापण्यासाठी लागणारे ६ सुरे असा मुद्देमाल एकुण ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क २६९,१८८ महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा ) अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) (क) ९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!