३१ मे चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवास ; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

३१ मे चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवास ; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती सोहळा शुक्रवार दि.३१ मे २०२४ रोजी सकाळी ११ वा. श्रीक्षेत्र चौंडी (ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी निमंत्रण दिले आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मस्थळ आहे. दरवर्षी या ठिकाणी ३१ मे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून विविध विकास कामांमुळे चौंडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी जयंती उत्सवास विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नामवंत, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. यंदाच्या जयंती सोहळ्यापासून त्रिशतकीय जयंती उत्सवास प्रारंभ होत असल्याने यंदाच्या कार्यक्रम विशेष असणार आहे.
या सोहळ्यास खा.डॉ.सुजय विखे, खा.सदाशिव लोखंडे, आ.बबनराव पाचपुते, आ.बाळासाहेब थोरात, आ.शंकरराव गडाख, आ.प्राजक्त तनपुरे, आ.मोनिकाताई राजळे, आ.संग्राम जगताप, आ.निलेश लंके, आ.अशुतोष काळे, आ.लहुजी कानडे, आ.सत्यजित तांबे, आ.रोहित पवार, आ.डॉ.किरण लहामटे आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, खा.विकास महात्मे, आ.दत्तात्रय भरणे, आ.गोपीचंद पडळकर, आ.नारायण पाटील, आ.प्रकाश शेंडगे, आ.अनिल गोटे, आ.अनंतकुमारपाटील, आ.पोपटराव गावडे, आ.रमेश शेंडगे, आ.नानाभाऊ कोकरे, आ.हरिभाऊ भदे, आ.रामहरी रुपनवर, आ.रामराव वडतुके, आ.विजयराव मोरे आदी राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. या जयंती सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ.प्रा.राम शिंदे यांनी केले.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!