👉तीन चारचाकी वाहनांसह 16 दुचाकी केल्या परत
👉 मूळ मालकांनी कोतवाली पोलिसांचे मानले आभार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात बर्याच दिवसांपासून पडून असलेल्या सुमारे वीस लाख रुपये किमतीची वाहने मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी 16 दुचाकी आणि तीन चारचाकी वाहने मूळ मालकांच्या हवाली केली आहेत. चोरी, अपघातातील वाहने परत मिळाल्याने मूळ मालकांनी कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक करत आभार मानले.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात बर्याच मोटारसायकली व चारचाकी वाहने अनेक वर्षांपासून पडून होत्या. ऊन, वारा, पावसामुळे उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान होत होते. त्यामुळे या वाहनांचे रेकॉर्ड काढून मूळ मालकांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचार्यांना दिले होते. कोतवालीच्या पोलिस कर्मचार्यांनी दुचाकींचे चेचीस नंबर, वाहन क्रमांक यावरून मूळ मालकांचे पत्ते शोधून काढले आणि त्यांना संपर्क केला. गेल्या महिनाभरापासून वाहनांचे मूळ मालक यांना वाहने घेऊन जाण्यासाठी आवाहन कोतवाली पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत दोनवेळा मूळ मालकांकडे त्यांची वाहने सुपूर्द करण्यात आली आहेत. लाखो रुपयांची वाहने नागरिकांना मिळाल्याने त्यांनी कोतवाली पोलिसांचे आभार मानले. 16 दुचाकी तसेच एक लक्झरी बस, एक टाटा 1109 टेम्पो, एक मारुती 800 कार या वाहनांचा यामध्ये समावेश आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस अंमलदार विजय साबळे, तनवीर शेख, जयश्री सुद्रीक यांनी कोल्हापूर येथील विजय वतारे यांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली.
………………………
यांना केली वाहने परत
फैरोज मुस्ताक खान (रा.सर्जेपुरा,अहमदनगर), विशाल प्रविण देडगावकर (रा.कापड बाजार, अहमदनगर), अल्ताब अल्लाउद्दीन बागवान (रा.नवनागापुर), अनिता शिवराम भोसले (रा.देउळगाव सिध्दी,जि.अहमदनगर), कल्पना भाउसाहेब मोढवे (रा.कोतकर गल्ली,अहमदनगर), लताबाई सुखलाल काळे (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा), अजय नंदलाल गंगवाल (रा. सारसनगर, अहमदनगर), सोमनाथ श्रीहरी शेळके (रा.वाळुंज, अहमदनगर), विक्रम कारभारी पवार (रा. नगरसुल, ता.येवला जि.नाशिक), सुनिल वसंत बोरसे (रा. प्रसादनगर चोपडा, ता. चोपडा, जि जळगाव), अमोल जंबु पवार (रा. कल्याणरोड, अहमदनगर), ऋषिकेश भाउसाहेब गुजर (रा.घोडेगाव, ता.नेवासा), रुपचंद कृष्णा कळमकर (रा. बोल्हेगाव,ता.जि.अहमदनगर), सुमित गणपत अहिरेकर (रा.सहकारनगर, पुणे), ब्रम्हदेव म्हातारदेव कांबळे (रा.बावी डोईठान,ता.आष्टी,जि.बीड), गोरख गुलाब खोमणे (रा.मुढाळे, ता.बारामती, जि.पुणे), नारायण यादव धाडगे (रा. नागरदेवळे, ता.जि.अहमदनगर), गणेश विठ्ठल शेकडे (रा.म्हसोबाची वाडी, ता.आष्टी,जि.बीड), परिक्षित सुरेश खर्चे (रा. लोणवाडी, ता. मलकापुर, जि. बुलढाणा),
…………………………
या अटींवर वाहने केली परत
वाहने देत असताना काही अटी मूळ मालकांना कोतवाली पोलिसांनी घालून दिल्यात. दुचाकी कोणास न विकणे, दुचाकीत कोणता बदल न करणे, वेळोवेळी पोलिस तसेच न्यायालयाकडून बोलावणे आल्यास हजर राहणे, या सर्व अटींवर दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.