संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : इयत्ता १२ वी पेपर फुटी प्रकरणी ‘मुंबई गुन्हे शोध टिम’ने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथील ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबई येथे चौकशीसाठी घेऊन गेले आहे.
‘मुंबई गुन्हे शोध टिम’ने ही कारवाई करताना मोठी गुप्तता पाळली असल्याने स्थानिक पोलिसांनाही या कारवाईबाबत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु ,पेपर फुटी संबंधित असणाऱ्या ५ जणांना ‘मुंबई गुन्हे शोध टिम’ने मुंबईला घेऊन गेले आहेत. यात काही महिलांचाही समावेश असलेल्यानाही ‘मुंबई गुन्हे शोध टिम’ने ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजारा दिला आहे. गुन्ह्याचा चौकशीसाठी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.