संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील बोधेगाव येथील सचिन भिमराव बावणे या युवकाने डायल ११२ ला खोटी माहीती दिली. खोटा काॅल केल्याबद्दल बोधेगाव दूरक्षेत्रचे ११२ चे ड्युटीवरील अंमलदार पो.काॅ. संदीप म्हस्के यांनी काॅलर विरूध्द शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि २८ जुलै रोजी घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बोधेगाव येथील सचिन भिमराव बावणे (वय २७ रा बोधेगाव ता शेवगाव) या युवकाने शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोबाइल क्रमांकवरून एमडीटी ११२ वर कॉल करून मला संतोष नामक व्यक्तीने चाकू मारला आहे, अशी माहिती दिली. या घटनेची ११२ ने तातडीने दखल घेऊन शेवगाव पोलिस ठाण्यातून बोधेगाव पोलिस दुरक्षेत्र कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली असता तात्काळ पोउनि भास्कर गावडे, पोना संदिप मस्के वाचा संभाजी धायतडक यांनी युवकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल बंद होता. तसेच पोलीस इतरत्र शोध घेतला असता सापडला नाही, चौकशी करून त्याच्या राहत्या घरी गेले असता, हा युवक घरात आढळून आला होता. पोलीसांनी संतोष नामक व्यक्तीने चाकू मारल्याच्या घटनेबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन चाकू मारल्याची काही एक घटना घडली नाही, असे सांगितले.
११२ वर खोटे कॉल करून जाणून-बुजून पोलिस प्रशासनाची दिशाभूल करून पोलीसांना त्रास व्हावा, म्हणून खोटी महिती दिल्याचे पोलिस चौकशीत उघड झाल्यानंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेऊन बोधेगाव पोलिस दुरर्क्षेत्र येथे घेऊन आले पोलिस प्रशासनाने पोना संदिप मस्के यांच्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीसांना खोटी माहिती देऊन पोलिस प्रशासनाची दिशाभूल करून शासकीय सुविधेचा दुरूपयोग केला म्हणून गुन्हा दाखल करून युवकास अटक केली आहे.
संकलन: बाळासाहेब खेडकर, बोधेगाव