हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणारे आरोपी अटक ; एलसीबी व तोफखाना पोलीस टिमची कारवाई
: हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणारे आरोपी अहमदनगर एलसीबी व तोफखाना पोलीसांच्या टिमने पकडले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी व तोफखाना पोलीस टिमचे सपोनि गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, बापुसाहेब फोलाने, दत्तात्रय गव्हाणे, दत्ता हिंगडे, पोना लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रविंद्र कडले, सचिन अडबल, संतोष खैरे, विशाल गवांदे, विजय ठोंबरे, पोकाॅ सागर ससाणे, रविंद्र घुंगासे चापोहेकॉ संभाजी कोतकर तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोसई सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोना अविनाश वाकचौरे, पोकॉ शिरीश तरटे, पोकाॅ सतिष भवर आदिंनी ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.७ ऑक्टोबर २०२३ रोजी फिर्यादी हेरंब रामचंद्र कुलकर्णी रा. बालाजी चेंबर्स, श्रमीकनगर, सावेडी, अहमदनगर हे व त्यांचे मित्र दुचाकीवरुन जात असतांना तीन अनोळखींनी दुचाकीवर येऊन फिर्यादीची दुचाकी अडवून फिर्यादी व साक्षीदार यांना लोखडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले होते. त्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४७४ / २०२३ भादवि कलम ३०७, ३२४, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे यांना गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन अटक करण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार एलसीबी व तोफखाना टिमने अहमदनगर शहरातील गुन्हा घडले ठिकाणचे तसेच, निलक्रांती चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, प्रेमदान हाडको, जोशी क्लासेस येथील सी. सी. टी. व्ही. फुटेज प्राप्त करुन फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करता सदरचा गुन्हा हा चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा, अहमदनगर) याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याने निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सांगितले की, त्याचा मित्र अक्षय विष्णू सब्बन याची सिताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी असून पानटपरी ही अतिक्रमणामध्ये येत असल्याने हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांनी पानटपरी काढण्याबाबत महानगरपालिका येथे अर्ज दिल्याने ती पानटपरी काढण्यात आलेली होती. त्याचा राग मनात धरुन अक्षय विष्णु सब्बन याच्या सांगणेवरुन चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा, अहमदनगर), अक्षय पुर्ण नांव माहित नाही, सनि जगधने, एक विधीसंघर्षीत बालक अशांनी मिळून केला असल्याचे सांगितले. सहभाग असणा-यांचा पोलिस शोध घेता अक्षय विष्णु सब्बन (दातरंगे मळा, विटभट्टीजवळ, ता. जि. अहमदनगर), चैतन्य सुनिल सुडके (सुडकेमळा, अहमदनगर), एक विधीसंघर्षीत बालक असे मिळून आला. इतर फरार अक्षय पुर्ण नांव माहित नाही, सनि जगधने पूर्ण नांव पत्ता माहित नाही, यांचा शोध घेता ते मिळून आलेले नाही, मिळून आलेल्या इसमांना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.