संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहाता – प्रवरेच्या ७२ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळासह सभासदांचे लक्ष वेधले.
प्रवरा ही या परिसरातील शेतकर्यांची कामधेनू असुन या परिसरातील वर्षानुवर्ष सभासद, उसउत्पादक, शेतकरी, कामगार यांच्या घामावर ही कामधेनु उभी असल्याची भावना वार्षिक सर्वसाधारण सभेत अरुण कडु पाटील यांनी व्यक्त केली.
सर्वसाधारण सभेत वार्षिक अहवालावर बोलताना ते म्हणाले प्रवरेचे आज एकुन गळीत ९ लाख ६० हजार असुन त्यापैकी ५ लाख ६२ हजार म्हणजे ६५% उसाचे गाळप कार्यक्षेत्राबाहेरील आहे. या कार्यक्षेत्राबाहेरील उसाला येणारा वाहतुक व तोडणी खर्च सभासदांच्या माथी नको याला आमची हरकत आहे. कारखान्यातून होणाऱ्या उपपदार्थाचा मोबदला सभासदांना दिला जात नाही. तसेज गणेश व प्रवरेच्या करारावर उच्च न्यायालयात याचिका दाखल असुन ती न्यायप्रविष्ट आहे. त्यावर बोलणे उचित नाही मात्र ज्याचा भावावर परिणाम होतो त्याबाबत सभेत बोलणे अनिवार्य आहे. बंद पडलेला व तोट्यात असलेला सर्व माथी मारुन गणेश कारखाना सन २०१४ पासुन चालवायला घेतला तो निर्णय अतीशय आत्मघातकी ठरलेला असुन हा संपूर्ण व्यवहार सुरवातीपासून आजतागायत तोट्यात आहे. प्रत्येक वर्षाच्या अहवालाचे अवलोकन केले असता प्रत्येक वर्षे सन २०२१ अखेर गणेश प्रीत्यर्थ १०६ कोटीचा तोटा आपण सभासदांच्या माथी मारला आहे. गणेश चा हा तोटा व बँकेचे व्याज सभासदांच्या घामातुन पिकवलेल्या उसातुन दिले जाते हे खेदजनक आहे.
हुतात्मा किसन वीर साखर कारखान्याचे नेतृत्व प्रतापराव भोसलेंनी केले. आज तो कारखाना एक हजार कोटीसह बुडाला हुतात्मा किसन वीर हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी होते आज खरे तर त्याच्या नावाला हे गालबोट आहे. तोचं प्रसंग प्रवरेला येवु शकतो किसन वीर कारखाना व प्रवरा कारखाना आज एकाचं बोटीने प्रवास करत असल्याची खंत अरुण कडु यांनी व्यक्त केली.
वर्षानुवर्ष खोडकी वाढे, इतर स्वरुपात आधिकचा भाव आपण दिवाळीला सभासदांना द्यायचो त्यामुळे सभासदांची दिवाळी समाधानाची जायची या दिवाळीला कार्यक्षेत्रातील उसउत्पादक, सभासद शेतकर्यांना ३००/- रूपये द्यावेत अशी मागणी सभासदांच्या वतीने कडु पाटील यांनी केली.
यावेळी एकनाथ घोगरे, बी.के विखे, बबन कडु देखिल ऑनलाईन सभेस उपस्थित होते.