सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : हिंदू समाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ व नगर शहरातील बजरंग दलाचे शहर संयोजक कुणालजी भंडारी व रामवाडी येथील अशोक लोंढे शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने या गावातील अमोल जरे या हिंदू तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अखंड हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पाथर्डी प्रखंडच्या वतीने पोलीस निरीक्षक पाथर्डी यांना निवेदन देण्यात आले.
आरोपींना तात्काळ अटक करावी व कठोर शासन करावे. अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. दिवसेंदिवस हिंदू धर्माचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जाणूनबुजून हल्ले केले जात आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी कार्येकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री देवा पवार, प्रमोद राऊत, अमोल वाघ, शिवनाथ घाटोळ, उद्धवजी केदार, आदिनाथ दराडे, भरत आंधळे, रवींद्र गायकवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्ताभाऊ दारकुंडे, नाना पालवे, पंकज अण्णा राठी, निलेश इजारे, अमित शिंदे, ईशांत बुधवंत, ऋषिकेश शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.