संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- हिंदू कोल्हाटी समाज सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन भाऊ जाधव यांची तर कार्याध्यक्षपदी बारामतीचे माजी नगरसेवक अभिजीत काळे यांची निवड करण्यात आली.
अहमदनगर येथील मंगलगेट भागात रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. प्रकाश महाराज मुसळे (बार्शी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समाज बांधवांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील बैठकीत खालील प्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. सचिव – युवराज गांगवे (कोपरगाव), उपाध्यक्ष – बाळासाहेब काळे (सोलापूर), संपत अंधारे (बार्शी), खजिनदार – ॲड. शरद अंधारे (मुंबई), सहसचिव – संतोष चंदन (औरंगाबाद), कायदेशीर सल्लागार – ॲड. डॉ. अरुण जाधव (जामखेड), ॲड. वैभव काळे (बारामती), श्रीमती शैलाताई मुसळे (बीड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांचा उपस्थितांच्या वतीने शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीस धैर्यशील काळे (बारामती), राम अंधारे (शेवगाव), रत्नाकर शिंदे (केज), माजी नगरसेवक अमित जाधव (जामखेड), अरुण डोळस (जामखेड), उक्कलगावच्या सरपंच कविता चंदन, खांडवीचे सरपंच नरेश जाधव, कोथळा चे सरपंच दिपक जाधव, वडगाव चे सरपंच चंद्रकांत काळे, प्रकाश जाधव (धुळे), मिलिंद काळे (पुणे), अभय कुमार तेरदाळे (मोड निंब), छाया नवले (नगर), आतिश भवर (नगर), रुपेश गंगावणे (शिरूर), प्रकाश मुसळे (परांडा), समाधान अंधारे (भुम), सुरेश जाधव (नगर), अनिल वर्पे (पुणे), सुनिल काळे (पुणे), मुकेश अंधारे (भूम), रमेश जाधव (इंदापुर), सुरेश अंधारे (नगर), मंदा चंदन (जामखेड) यांच्यासह अनेक समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या.
अध्यक्षीय निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना माजी नगरसेवक सचिन जाधव म्हणाले की, समाजाने माझ्यावर मोठा विश्वास टाकून समाजाच्या संघटनेची अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. त्या सर्व समाजबांधवांच्या विश्वासाला पात्र ठरून सर्वांना सोबत घेऊन समाज हिताची कामे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल.
यावेळी मिलिंद काळे, युवराज गांगवे, ॲड. अरुण जाधव, ह. भ. प. प्रकाश महाराज मुसळे यांचीही भाषणे झाली. सचिन भाऊ जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अभिजीत काळे यांनी प्रास्ताविक केले. धैर्यशील काळे यांनी संघटनेची भूमिका मांडली. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. राम भाऊ अंधारे यांनी आभार मानले. आगामी काळात संघटनेची रीतसर नोंदणी करून पुढील कार्याची दिशा ठरविली जाईल असे कार्याध्यक्ष अभिजीत काळे यांनी जाहीर केले.