👉👉शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शेवगाव तालुकाप्रमुख पदी आशुतोष डहाळे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे भाजपाच्या बरोबरीने राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर शिवसेनेची वाटचाल सुरु असून, सत्तेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कायम कटीबद्ध असून, तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे भुमिका आणि हिंदूत्वाचा अजेंडा घेऊन खरे शिवसैनिक म्हणून आपणा सर्वांना काम करावयाचे आहे. शेवगांवमध्ये आशुतोष डहाळे यांनी शिवसैनिक म्हणून केलेल्या कार्याची पावती म्हणून तालुकाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. त्या माध्यमातून तालुक्यातील पक्षाचे प्राबल्य निर्माण करतील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शेवगाव तालुकाप्रमुख पदी आशुतोष दत्तात्रय डहाळे यांची निवड करुन जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन राऊत, भिंगार शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे, नगरसेवक रवी लालबोंद्रे, नगरसेवक संजय छजलानी, अमोल हुंबे, अभिषेक भोसले, ओंकार सातपुते, निखिल खेडेकर, आशुतोष पुरणाळे, विक्रांत लांडे, गोपाल धूत, निखिल गोपाळघरे, मनोज दहिफळे, अभिषेक डहाळे मित्रपरिवार उपस्थित होता.
यावेळी नवनियुक्त तालुकाप्रमुख डहाळे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करू तसेच शिवसेनेची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करुन शेवगांव तालुक्यात जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले.
श याप्रसंगी सचिन जाधव, दिलीप सातपुते आदिंनीही मनोगतात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अनेक युवक मोठ्या संख्येने सहभागी होत असून, त्यांना योग्य तो सन्मान पक्षाच्यावतीने देण्यात येईल, असे सांगितले.