स. महर्षी भाऊसाहेब थोरात स. सा.कारखाना सेवकांची पतसंस्था अमृतनगर संस्थेच्या चेअरमनपदी संजय चव्हाण तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब म्हस्के
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था अमृतनगर या संस्थेच्या चेअरमनपदी संजय दादाभाऊ चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या व्हा.चेअरमन पदी बाळासाहेब मारुती म्हस्के तसेच सेक्रेटरीपदी अतुल किसन देशमुख व श्री राहुल बबन जोंधळे यांचे निवड करण्यात आली आहे.
संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांसाठी ही पतसंस्था असून या पतसंस्थेचा मोठा आर्थिक कारभार आहे. अशा या पतसंस्थेच्या चेअरमन पदी संजय दादाभाऊ चव्हाण यांचे सह वरील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. त्यांचा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री घुगरकर साहेब व सेक्रेटरी श्री कानवडे साहेब यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे. तसेच पतसंस्थेचे
सर्व संचालक, कर्मचारी व सभासदांच्या वतीनेही त्यांचा नुकताच कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन संजय दादाभाऊ चव्हाण यांनी सांगितले की, राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेचा पारदर्शी कारभार सुरू असून नामदार बाळासाहेब थोरात यांनी व सर्व संचालकांनी आपली चेअरमन पदी निवड केली .या निवडीची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू, संस्थेच्या प्रत्येक सभासदांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आपण सर्व संचालकांच्या, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करू, व या संस्थेचा अधिक अधिक विकास कसा होईल यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. असे सांगत त्यांनी नामदार बाळासाहेब थोरात व सर्व संचालकांनी , माझ्यावर जी जबाबदारी टाकली व मला चेअरमन केले .त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
या पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संजय दादाभाऊ चव्हाण, व्हा. चेअरमन बाळासाहेब मारुती म्हस्के तसेच सेक्रेटरी अतुल किसन देशमुख व राहुल बबन जोंधळे यांचे नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख, संगमनेरच्या नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, यांनी अभिनंदन केले आहे.त्याचप्रमाणे या पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन दादाभाऊ संजय चव्हाण हे क्रांतिकारी रामोशी समाजाचे राज्य प्रतिनिधित्व करणाऱ्या नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे प्रांत अध्यक्ष वसंतराव चव्हाण, देवराम गुळवे ,बंडोपंत खर्डे गुरुजी, राज्य सरचिटणीस राजकुमार गडकरी, संजय शिरतार, सुभाष जेडगुले, तानाजी शिरतार, शिवाजी गडकरी, अजय यरमल, सुनील गुळवे, आदिसह या पतसंस्थेचे सर्व सभासद, संचालक तसेच पेमगिरी व संगमनेर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.व सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात येत आहे.