स.पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना राज्यपालांच्या हस्ते “सरहानिय सेवा मेडल ” प्रदान

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news Natwork
अहमदनगर –
ठाणे शहर गुन्हे शाखेचे स.पोलीस आयुक्त अ‌‌शोक राजपूत यांना राज्यपाल भगतसिंग कोशियारी (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते‌ नुकतेच “सरहानिय सेवा मेडल” राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य पोलीस महासंचालक रजनीश सेठ, महाराष्ट्र राज्य संजय कुमार पोलीस महासंचालक प्रशिक्षण व महाराष्ट्र राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थित होते.

अशोक लालसिंग राजपूत मूळनिवास मुक्काम पोस्ट शिंदी, (ता. भुसावळ, जि. जळगाव) पोलीस उपनिरीक्षक म्हणून १९९२ ला एमपीएससी मार्फत निवड झाली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथम नियुक्ती नागपूर येथे झाली. त्यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तालय,अँटी करप्शन विभागा औरंगाबाद, अहमदनगर जिल्हा मध्ये एमआयडीसी व राहुरी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी म्हणून ७ वर्षे काम पाहिले. सीआयडी विभाग औरंगाबाद, त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा, नेरूळ पोलीस स्टेशन, पनवेल तालुका पोलीस स्टेशन, येथे काम केले, त्यानंतर चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड या ठिकाणी कर्तव्य बजावले. १९९२ पासून आता पावतो अवैद्य दारू विक्री करणारे गुन्हेगार व डोळ्या व बनवणारे गुन्हेगार टोळ्या, अमली पदार्थ विकणारे गुन्हेगार टोळ्या, दरोडा अवैद्य शास्त्र विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्या टोळ्यांना जेरबंद करून बरेच गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आणले. जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी महिलांचे मंगळसूत्र तोडून पळणारे गुन्हेगारटोळ्या, दरोडा करणाऱ्या टोळ्या जेरबंद केल्या व त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकिस आणून माननीय न्यायालयात बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आरोपींना सजा झालेली आहे. खुणाचे सुद्धा बरेच संवेदशील गुन्हे मोठ्या सीताफिने उघडतीस आणण्यात त्यांना यश आलेले आहे. गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने आरोपींना दोषी धरून जन्मठेपे सारख्या शिक्षा दिलेले आहेत. त्यांना चांगल्या कामगिरीमुळे शासनाकडून २००८ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली व नंतर डिसेंबर २००१ मध्ये पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आलेली असून सध्या अशोक राजपूत हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून गुन्हे शाखा ठाणे शहर येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना वरिष्ठांकडून ७०० बक्षिसे व १४० प्रशंसापत्र प्राप्त झालेले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रपतींचे “सरहानिय सेवा मेडल ” घोषित करण्यात आले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!