स्वास्थ हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर संपन्न

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
नगरचे स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकलअँड रिसर्च सेंटर व लक्ष फौंडेशन संचलित अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विध्यमाने भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वास्थ हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या अगोदर हॉस्पिटलमध्ये ॲड अशोक गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वास्थ्य हॉस्पिटलचे संचालक हृदयरोग तज्ञ्ज डॉ.अभिजित पाठक व डॉ.रेणुका पाठक, डाॅ.वैभव पालवे व रुग्णालयातील कर्मचारी उत्स्फुर्तपणे याप्रसंगी उपस्थित होता. ॲड. अशोक गांधी यांनी.स्वास्थ्य हॉस्पिटल च्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. श्री गांधी यांच्या हस्ते यावेळी “स्वास्थ्य कार्डिओ क्लब कार्ड” चे हृदय रोगाचा व मधुमेह चा त्रास होत असलेल्या रुगणांना वितरण करण्यात आले.

डॉ.अभिजित पाठक या योजने विषयी बोलताना सांगितले की, एखादा व्यवसाय अथवा सेवा कार्य करताना आपणही समाजाचे काही देणे लागतो अश्या उदात्त भावनेने आम्ही या कार्डचे वितरण करीत असून या कार्ड धारकांना हृदय व मधुमेह रोगाशी संबंधित सर्व तपासण्या एक फेब्रु-२०२३ पासून पुढे सपूर्ण वर्षभर अत्यल्प अश्या अवघ्या रुपये ३१०० दरात व कमी वेळेत स्वास्थ्य हॉस्पिटल येथे करण्यात येणार असून या योजनेचा संबंधितांनी व गरजूंनि फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशा.आधि.डॉ.सय्यद सलमा, डॉ.मनीषा फलके, मंदार जोशी,सिस्टर लिसी पंडित, सिस्टर सोली, अमित शिरसाठ, विनोद पांडित , राणी साठे आणि हॉस्पिटलचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. महत्वाचे म्हणजे रक्तदान शिबिराच्या प्रारंभी डॉ.अभिजित, डॉ.रेणुका पाठक व चिरंजीव डॉ.मिहीर पाठक यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिरात एक वेगळा आदर्श दाखविला.त्यानंतर 3७ जणांनी रक्तदानात सहभाग नोंदविला. डॉ अभिजित पाठक बोलताना म्हणाले कि रक्तदान हे संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ दान असून सध्याच्या अत्याधुनिक युगात आता एका रक्तदात्यामुळे तीन रुग्णांना जीवनदानाचे पुण्यकार्य घडते रक्तदात्याच्या एका पिशवीतून आता विघटन करून त्यातील लालपेशी,प्लेटलेट,प्लास्मा,वेगळे केले जाते व पेशंटला ज्याची आवश्यकता असेल त्यांना दिले जाते व गरजू पेशंटला त्यातून जीवनदान मिळते ते पुढे म्हणाले कि सध्या गरजेच्या २५ ते ३० टक्के रक्ताचा सर्वत्र तुटवडा भासत असून अश्या शिबीरातून तो तुटवडा कमी करता येईल.अनेकांचा निगेटिव्ह ब्लडग्रुप असतो हा रेअर ब्लड ग्रुप असून तपासण्याच्या अभावी अनेकांना आपला ग्रुप निगेटिव्ह आहे हे माहीतच नसते अश्यानी तपासण्या करून घ्याव्यात जेणें करून अनेक रुग्णांना यातून जीवनदान मिळेल अशी अशा व्यक्त केली रक्तदान विषयीचे अनेक गैरसमज असून मी डॉकटर या नात्याने सर्वांना आवाहन करतो कि २४ ते४८ तासात रक्तदान केलेल्यांची सपूर्ण रिकव्हरी होते. त्याचे कोणतेही साइड इफ्फेक्ट नसल्याचे हि त्यांनी आवर्जून सांगितले. अर्पण ब्लड बँकेचे संचालक डॉ शशांक मोहळे, डॉ.अजिंक्य आठरे, सुप्रिया पवार,श्रीकांत कल्याणकर, प्रतिक्षा चिमूलकर व रींना निर्मल यांनी या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.
दुपारच्या सत्रात स्वास्थ हॉस्पिटल,जय भवानी बहुउदेशीय प्रतिष्ठान(ट्रस्ट)यांच्या सैयुक्त विध्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजने अंतर्गत जय भवानीनगर , कसबेवस्ती, भिस्तबाग,सावेडी येथे सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. याची उदघाटन महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते संपतदादा बारस्कर,आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे व हृदयरोग तज्ञ् डॉ.अभिजित पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यांची डॉ.अभिजित पाठक व डॉ.सागर बोरुडे यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले. डॉ सलमा सय्यद यांनी आभार मानले.
संकलन: प्रेस फोटोग्राफर- अनिल शाह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!