👉 मुंबई (बातमीदार)संगीत क्षेत्रात नव कलाकारांच्या प्रतिभेला सन्मान मिळतो
👉नियमित सराव आणि कठोर परिश्रमाने यशोशिखर काबीज करता येते : पद्मश्री अनुप जलोटा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई – स्वर सुधा सांस्कृतिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्थाचे वतीने संगीत क्षेत्रात नव कलाकारांच्या प्रतिभेला नेहमीच सन्मान मिळतो.नियमित सराव आणि कठोर परिश्रमामुळे यशोशिखर काबीज करता येते. आपल्या अंगच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून योग्य गुरुच्या सानिध्यात आणि मार्गदर्शनात कठोर परिश्रम व सराव केल्यास यश प्राप्ती नक्कीच होते.प्रेक्षकांच्या मनात आपल्या दर्जेदार कलेचे स्थान निर्माण केल्यास काहीच कमी पडत नाही म्हणून या क्षेत्रात आपले करियर करणाऱ्या नव कलाकारांनी प्रामाणिकपणे अविरत कष्ट करण्याची तयारी ठेवावी म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल असा वडीलकीचा सल्ला नव कलाकार आणि उपस्थित प्रेक्षकांना संगीत क्षेत्रातले दिग्गज गायक पद्मश्री अनुप जलोटा यांनी दिले.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक राजकिशोर ठाकूर यांनी अनुप जलोटा यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
जुहू येथील इस्काॅन ऑडीटेरिएममध्ये गुरुवार ता.12 रोजी सायंकाळी 8 वाजता स्वर सुधा सांस्कृतिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आयोजित स्वरसुधा संगीत कार्यक्रमात आपली कला सादर करते वेळी मार्गदर्शन करताना केली.
कार्यक्रमास मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होत्या.सोबत करुणा मुंडे, मरिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस.मोदी, मोहम्मद नाझनी, मोहन भंडारी, जेष्ठ पत्रकार विठ्ठल शिंदे उपस्थित होते.
स्वर सुधा सांस्कृतिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष राजकिशोर ठाकूर,तसेच उमदा तरुण कलाकार जनक ठाकूर, यांनी या कार्यक्रमातुन युवा संगीतकारांच्या आणि गायकांच्या कलेला व्यासपीठ मिळावे आणि जगात त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
कोरोना महामारीला सामोरे जात संगीत जगत पुन्हा नव भरारी घेत असून गेले अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कलावंत व गायक, वादक, सिंगर,सुत्रचालक, मिमीकरी,छोटे मोठे कलाकार यांना पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमातून नव कलाकार जगासमोर आपली प्रतिभा सिद्ध करतील असे गझल गायक पद्मश्री अनुप जलोटा यांनी म्हटले.माझ्या सोबत या नविन तसेच काही नामवंत कलाकार एकत्र आलो आहोत याचा जास्त आनंद होतोय असे ते पुढे म्हणाले.
यावेळी दिलीप सेन गायक,सलीम मर्चंट गायक, जावेद अल्ली गायक, सोहाबाज खान,कमल सबरी सारंगी (वादक),पिन्नाझ मोसनी (गायक),मोहम्मद अली नाझनी (गायक), उस्ताद फयजल कुरेशी (तबलावादक),निम अल्ली तरकवा (गझल गायक), राघव कपूर (गायक),जनक ठाकूर (गायक कंपोझीटर),गीताबेन छाबला (मुझिक डायरेक्टर), आदी कलाकारांच्या समुहाने आपल्या कलेचे प्रदर्शन करीत उपस्थित प्रेषकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरतुजा सिद्दीकी यांनी केले.कार्यक्रमास विशेष उपस्थिती जेष्ठ पत्रकार विठ्ठल शिंदे,किसान वेल्फेअर ट्रस्ट होतेचे मोहन भंडारी,स्वर सुधा सांस्कृतिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्थाचे पदाधिकारी अर्शद काजमी,अशोक काळे,शंकर नायडू,विजय खेर,मुकेश चिंचावले,विनोद शिंदे,तयुब भाटी,मोहन जोशी,रवी भुसा, सुनिल कुमार ठाकुर,प्रसाद शर्मा, पवन मीना,श्रीकृष्ण सोनी,वकार अर्शद आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.