स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

👉१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविणार विविध उपक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जिओ टॅगिंग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच ( एफटीके ) द्वारे तपासणी व त्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यासाठी दिनांक १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान स्वच्छ जल से सुरक्षा अभियान जिल्ह्यात राबविले जाणार असून गुरुवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण २०२३ चा भाग असणारे स्वच्छ जल से सुरक्षा अभियान १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी,संदिप सांगळे, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन सुरेश शिंदे,विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक,आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक, बी.आर.सी, सी.आर.सी, जिल्हा कक्षातील सल्लागार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संदिप सांगळे म्हणाले की ग्रामीण भागात हे अभियान राबविले जाणार असून पाणी आणि आरोग्य याचा निकटचा संबंध आहे .ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज आहे. आपण ज्या गावातून आलो आहोत ,त्या ठिकाणी जरी आपण शुद्ध पाण्याबाबत आग्रह धरला,पाठपुरावा केला, तरी देखील मोठे काम होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी असे आवाहन श्री सांगळे यांनी यावेळी केले. तसेच रासायनिक व जैविक एफ.टी.के किटद्वारे पाणी नमुने तपासणीबाबतचे प्रशिक्षण ऑक्टोप्स कंपनीचे प्रतिनिधी मनिष पाटील यांनी रासायनिक पाणी तपासणीचे एकुण अकरा पॅरामिटर मध्ये सविस्तर प्रात्यक्षित दिले.तसेच स्वयंसेवक एफ.टी.के महिला जल सुरक्षक यांचे WQMIS संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी तसेच WQMIS संकेतस्थळावर पाणी नमुना तपासणीचे नोंदी करण्याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले.
या अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईल ॲप द्वारे अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठा योजना , रेट्रो फिटिंग मधील पाणी पुरवठा योजना व नवीन योजनेतील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधी मधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे तसेच सर्व पाणी नमुने जल सुरक्षका मार्फत गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
एफटीके किटद्वारे कशा पद्धतीने पाण्याची तपासणी करावी याबाबत गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येऊन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर त्यांची नावे अपलोड करण्यात येणार आहे. स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानात वरिष्ठ वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी सर्व पाणी नमुन्याची तपासणी करावी, रेट्रो फिटिंग, नवीन योजनातील स्त्रोतांची जिओ टॅगिंग केली जाणार आहे
१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा अभियानामध्ये हर घर जल या मोबाईल अॕपद्वारे जिल्ह्यातील अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजना व दुरुस्ती करण्यात येणाऱ्या योजनेतील मुख्य स्त्रोत यांचे जीओ टॕगींग करुन प्रयोगशाळेत व गावातील ५ महिलांच्या माध्यमातून एफटीकेच्या माध्यमातून पाणी नमुन्यांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन सुरेश शिंदे यांनी केले आहे. या कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संनियत्रण व मुल्यमापन तज्ञ रविंद्र ठाणगे यांनी केले व आभार पाणी गुणवत्ता निरिक्षक योगेश सुतार यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पाणी गुणवत्ता सल्लागार भागवत गोल्हार व जिल्हा कक्षातील सर्व सल्लागारांनी प्रयत्न केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!