स्री प्रोत्साहनपर सौ. श्रुती अभिजित बोज्जा – बत्तीन यांना मानपत्र देऊन सन्मान

स्त्रीचा सन्मान हा इतरांनी करण्यापेक्षा तिने स्वत:चा सन्मान केला पाहिजे :उद्योगपती अमोल येमुल

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर:
महिलांकडे बघण्याचा महिलांचाच दृष्टिकोन काही ठिकाणी बदलायला हवा. आपणच एकमेकींना साथ दिली तर कदाचित वर तोंड करून आपल्याला विरोध करणा-यांची वृत्ती कमी होण्याची शक्यता आहे. महिला म्हणून आपण वैविध्यपूर्ण भूमिका प्रेमाने पार पाडतो. एखाद्या परिस्थितीकडे भावुक पद्धतीने बघतो आणि ताकदीनिशी आपलं नाव व्यवसायात देखील कमावतो. या सगळ्यामुळे महिला असल्याचा अभिमान निर्माण होतो .कारण प्रत्येक स्त्रीने स्वत:चा सन्मान व्हावा यासाठी स्वाभिमानाने वागले पाहिजे. जे काही तुम्हाला करावेसे वाटत असेल आणि ते योग्य असेल तर त्या मार्गात येणा-या प्रत्येक अडचणींवर मात करत तुम्ही स्वत:ला सिद्ध केले पाहिजे.

आजच्या काळात प्रत्येकाला स्वत:चा सन्मान मिळावा, याकरिता झगडावे लागते म्हणून स्त्रीचा सन्मान हा इतरांनी करण्यापेक्षा तिने स्वत:चा सन्मान केला पाहिजे. आपल्यातील अनेक विशेष गुण शोधून आत्मपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने केवळ जगाला दोष देऊन प्रत्येक गोष्टीला दोषी ठरवण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने जगाला त्यांचा सन्मान करायला भाग पाडले पाहिजे. प्रत्येक स्त्री ही तिच्या वेगवेगळ्या कौशल्याने समृद्ध असते, त्यामुळे सुरुवातीलाच तिने आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. हाच हेतू साध्य करण्यासाठी पद्मशाली युवाशक्ती ( ट्रस्ट ) अहमदनगर, ‘पद्मशाली महिलाशक्ती’ अहमदनगर व ‘पद्मनादम ढोल, ताशा, ध्वज पथक’ अहमदनगर.यांच्या माध्यमातून स्री प्रोत्साहन दिले जाते.त्याअनुषंगाने सोमवारी सौ. श्रुती अभिजित बोज्जा – बत्तीन यांना मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
सौ. श्रुती अभिजित बोज्जा – बत्तीन या लोकसत्ता संघर्ष मध्ये मॅनेजर व सह संपादिका आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष करून त्या इथं पर्यंत पोहोचल्या आहेत.‌ त्या पद्मशाली समाजातील एकमेव महिला आहेत की त्यांनी या मिडिया क्षेत्रात आपला ठसा उमटवला.असून खरे पाहता या क्षेत्रात पुरूषांचे वर्चस्व आहे त्या क्षेत्रात करिअर करत असून यशस्वी होण्याचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या कार्याचा येणाऱ्या काळात समाजाला तसेच पद् मशाली समाजातील स्रियांना उपयोग व्हावा, आपल्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्री तयार व्हावी, या हेतूने हा सन्मान करण्यात आला असल्याचे संस्थेने सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती पेशवाई श्रीमंतचे मालक अमोल येमुल तसेच प्रसिद्ध मराठी, हिंदी आणि साऊथ चित्रपट अभिनेते प्रशांत नेटके पाटील, नगरसेवक मनोजभाऊ दुलम, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष भैय्या गंधे, मल्हार गंधे, रूगवेद गंधे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!