संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- महिला मकरसंक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात एकमेकींना वाण देतात अशा एकत्र येण्याने चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते व आपापसात स्नेह वाढतो असे प्रतिपादन भिंगार स्त्री सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वर्षा कीर्तने यांनी केले.
भिंगार श्री सखी महिला मंडळाच्या सदस्यांनी नुकताच मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने हार्दिक कुंकू कार्यक्रम व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाचे अध्यक्ष डॉ.वर्षा कीर्तने यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच आगामी वर्षात मंडळाची कोणती भूमिका असेल हे सांगितले. मंडळाच्या सचिव कल्पना चौधरी यांनी वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम राबविले गेले हे सांगितले, तर खजिनदार मिरा मुळे यांनी जमाखर्चाच्या अहवालाचे वाचन केले प्रास्ताविक जोस्त्ना मुंगी यांनी केले वर्षा धर्माधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुधा देव यांनी केले याप्रसंगी उपाध्यक्ष सुशीला मुळे, स्मिता मुळे, संगीता मुळे, सारिका धर्माधिकारी, स्वाती देशपांडे यांनी सर्व सदस्यां बरोबर संवाद साधून हळदी कुंकवाचे वाण दिले.
अत्यंत खेळण्याच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.