स्कूल बस चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वयाची गरज : संजय आव्हाड


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :
गेली २ वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळा बंद असल्याने स्कूल बसेसचा व्यवसाय पूर्णपणे थंडावला होता.आजही पूर्ववत हा व्यवसाय सुरु झालेला नसून येत्या जून २०२२ पासून राज्यातील शाळा पूर्ववत सुरु होण्याची शक्यता आहे.स्कूल बस चालक-मालक कर्मचाऱ्यांचा पूर्ववत रोजगार सुरु होण्यासाठी ठोस उपाय योजना समन्वयाने अमलात आणण्याची गरज असून महाराष्ट्र शासनाने व्यावसायिक कर १०० टक्के माफ केला आहे.उर्वरित अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु असून त्यालाही यश येण्याची अपेक्षा वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख संजय आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.


याबाबत श्री आव्हाड यांनी गत २ वर्षातील बंद व्यवसायाचे परिणाम आणि या काळातील बसेसचा मेंटेनन्स,थकीत कर्ज हफ्ते, चालक-मालक आणि कर्मचाऱ्यांवरचे बेरोजगारीचे संकट, त्यांची प्रापंचिक विवंचना कमी करतांना नव्याने झालेले कर्ज आदी बाबींचा प्रामुख्याने विचार व्हावा असे म्हंटले असून स्कूल बस चालक-मालक यांचे थकीत कर्जावरील व्याज माफ करावे, तसेच डिझेलच्या वाढलेल्या किंमती, मेंटेनन्सचा वाढीव खर्च,चालकासह कर्मचाऱ्यांचे पगार आदी खर्चाची तोंडमिळवणी करणे स्कूल बस मालकांना अडचणीचे ठरत असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असून या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे वाहतूक सेना व अखिल महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघाचे राज्याध्यक्ष उदय दळवी,महासचिव घनःशाम सांडीम, उपाध्यक्ष मनोज पावसे,सचिव शेख सिद्दीकी,प्रसिद्धी प्रमुख योगेश कांबळे आदींच्या मार्ग दर्शनाखाली संजय आव्हाड या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करत आहेत.
शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रादुर्भावाने बंद असलेला हा व्यवसाय १० फेब्रुवारी २०२२ पासून शाळा पुन्हा सुरु करण्याच्या निर्णय शासनाने घेतल्याने या व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरी शाळेच्या वेळेचे गणित आणि १०० टक्के मुलांना शाळेत पोहचविणे व पुन्हा मुलांना घरी आणणे आज आर्थिक दृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यातच डिझेलच्या वाढलेल्या किंमती, मेंटेनन्सचा खर्च,कर्मचाऱ्यांचे पगार आदीच्या शुल्कात वाढ झाल्याने नाईलाजास्तव स्कूल बसचे शुल्क ३० टक्क्याने वाढवावे लागले. असा खुलासा आव्हाड यांनी पत्रकात केला.
शासनाने १०० टक्के वाहतूक कर माफ केला असला तरी त्याचा लाभ सरसकट स्कूल बस मालकांना मिळत नाही तसेच करमाफी बरोबर इतर मुद्दे काही राज्य तर काही केंद्र सरकारच्या अख्त्यारीतले जे प्रश्न ते संबंधितांपुढे मांडून शासनाचे प्रतिनिधी ,लोकप्रतिनिधी , स्कूल बस चालक-मालक यांच्या संयुक्त बैठक आयोजित करून या व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल असे निर्णय घेतल्यास येत्या जून २०२२ पासून शाळा पूर्ववत सुरु होतील त्यावेळी स्कूल बस पूर्ववत धावतील आणि मधल्या २ वर्षातील तूट भरुन काढतांना नुकसान होणार नाही अशी स्थिती स्कुल बस चालक-मालकांना उपलब्ध होणे गरजेचे आहे.अशी अपेक्षा वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख संजय आव्हाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!