👉दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार
👉व्हॉट्सअॅप ग्रुपला ‘ओन्ली अॅडमिन’ सेटिंग लावा
👉आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर दिसून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे कोणीही कायदा हातात घेऊ नये..
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. तसेच, सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन्सला सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली असून, व्हॉट्सअॅपव ग्रुपच्या अॅडमिनने ‘ओन्ली अॅडमिन’ ही सेटिंग करण्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजकंटकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. शहरात सामाजिक शांतता रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जात असून, दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर येत असलेले मेसेज, फोटो आणि मजकूर यावर कोणताही विश्वास ठेऊ नये, तसेच आलेले मेसेज समोर फॉरवर्ड करू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने कोणी आक्षेपार्ह मेसेज केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. तसेच, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास आपसात वाद न घालता संबंधित व्यक्तीची माहिती नागरिकांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📥📥📥📥📥
पोलिसांना कळवा कायदा हातात घेऊ नका:
कोणीही कोणत्याही सोशल मिडीयावर दोन गटात / दोन धर्मामध्ये वाद होईल दोन समाजामध्ये जातीधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा पध्दतीने पोस्ट करु नये, केल्यास संबंधीतावर गुन्हा दाखल करुन कडक कायदेशिर कारवाई करणेत येईल तसेच असा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ, मजकुर अथवा छायाचित्र आपले व आपले ग्रुपचे सदस्यांचे निदर्शनास आल्यावर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी किंवा आम्हास कळवावे. कोणीही कायदा हातात घेऊन गैरप्रकार करु नये असे केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर कायदेशिर कारवाई करणेत येईल.
………………………………………….
👇👇👇👇👇
आक्षेपार्ह मेसेजला प्रतिसाद देऊ नका : पोलीस निरीक्षक यादव
सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नका. कायदा हातात घेऊन कोणीही गैरप्रकार करू नये. कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.