संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर येथील सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचे श्री कालिका देवी संस्थान अहमदनगर, कासार समाज बांधव नवरात्र उत्सव साजरा करतात या नवरात्रीचे नऊ दिवस कुलदैवत श्री कालिका देवीचे वाहन दररोज बदलले जाते. हे वाहन तयार करण्याची जबाबदारी मुर्तीकार धनंजय वेळापुरे गेली अनेक वर्षांपासून सांभाळत आहेत. दररोज संध्याकाळी 9 वाजता श्री कालिका मातेची महाआरती केली जाते या आरती साठी शहर आणि उपनगरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
यंदाच्या वर्षी सुध्दा कोरोना महामारी मुळे मंदिरात दर्शनासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत भाविकांना दर्शन दिले जाते. मंदिराचे व्यवस्थापन सांभाळण्याची जबाबदारी मंदिर विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र समिती मधील युवक सांभाळत आहेत.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील सर्व भाविकांनी श्री कालिका देवी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कासार समाज जिल्हाध्यक्ष मंगेश रासने आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र येंडे यांनी केले आहे.
संकलन : राजेंद्र येंडे पा.