संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर:- अहमदनगर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संस्थेची नुकतीच पोलीस अधिक्षक कार्यालयात बैठक पार पडली.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवानिवृत्तीनंतर आलेल्या विविध प्रकारच्या अडचणीबाबत यावेळी चर्चा झाली. येणारे समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कशा प्रकारे करता येईल, या संदर्भात पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तसेच पोलिसांची मुले -मुली यांना स्कील डेव्हलपमेंट कोर्स व नोकरी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पोलीसांच्या मुला – मुलींसाठी हाउस कीपिंग, इलेक्ट्रिक, प्लंबिंग, जनरल फायर, वेल्डिंग, CNG मशीन ऑपरेटर, नर्सेस, फोर व्हीलर (चार चाकी) टू व्हीलर मेकेनिकाल आदी कोर्सेस आहेत. ॲडमिशन (प्रवेश ), भोजन व रहाण्याची सोय विनामुल्य करण्यात येणार आहे.
अशी माहिती संस्थेचे जिल्हा अध्यक्ष नाथा घुले यांनी दिली ,या बैठकीला पोलिस अधिकारी दिलिपसिंग परदेशी,संजय भोंडवे,गोरक्षनाथ साबदे, शाम गायकवाड, यांच्यासह जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष नाथा घुले , दिलिपसिंग परदेशी यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचा सत्कार करुन उपस्थितांचे आभार मानले.