सुवर्णकमळ ग्रा. बि. शे. स. पतसंस्था बँकेचे उद्घाटन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील सुसरे येथे सुवर्णकमळ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थाचे उद्घाटन विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर राम महाराज झिंजुर्के व जि.प.सदस्य राहुल राजळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.पतसंस्थेचे संस्थापक श्रीधर कंठाळी व चेअरमन लक्ष्मण कंठाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णकमळ पतसंस्थेचे कामकाज सुरू करण्यात आले. यावेळी दादासाहेब कंठाळी, श्रीकांत मिसाळ, नानासाहेब कंठाळी, राजेंद्र उदागे,अशोक उदागे , महादेव जगताप, अमोल उदागे, सुभाष लाड यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राम महाराज झिंजुर्के म्हणाले, सुवर्णकमळ पतसंस्थेमध्ये अधिकाधिक सभासद व्हावे तसेच कामगारांना कर्ज देताना कामगारांची योग्य ती माहिती घ्यावी. कामगारांच्या समस्येकडे लक्ष देऊन कामगारांसाठी उभी झालेल्या पतसंस्थेची विविध ठिकाणी शाखा उपलब्ध व्हावी. अल्पावधीतच पतसंस्थेची सुसरे शाखा मोठी झेपही घेईल. त्याचबरोबर कामगारांना पतसंस्था आपलेसे करतील यात काही शंका नाही.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखेचे कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक शितल कंठाळी यांनी केले. आभार संचालक राम राऊत यांनी केले.