👉भिंगार पोलिसांची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – जिवे ठार मारण्याची ५० हजार रूपयांची सुपारी देणारा देवदरी रिसोर्टचा मालक विठ्ठल तुकाराम वामन व सुपारी घेणा-या त्याच्या साथीदारांना पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे. या सर्वांना पोलिसांनी प्रथम न्यायालयासमोर हजर केले असता ४ दिवस तर यानंतर पुन्हा सोमवारी (दि.२६) पुन्हा न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलिस कोठडी रिमांड न्यायालयाने सुनावले आहे.
विठ्ठल तुकाराम वामन (वय ४१ रा. देवगाव ता.जि. अहमदनगर), नानासाहेब उर्फ नानाभाऊ बबन वामन (वय ४१ रा. देवगाव ता. जि. अहमदनगर), विर दिपक सोनवणे (वय ३५ रा.रंगभवन, शंकर मंदीरजवळ, सर्जेपुरा ता. जि. अहमदनगर), राहुल उर्फ बंडू उत्तम घोरपडे (वय ३१ रा. मुन्सीपल कॉलनी, लक्ष्मीआई मंदीरजवळ, सिद्धार्थनगर ता.जि. अहमदनगर) कृष्णा उर्फ बच्चू सखाराम काते (वय ३०,रा. पंचशिल शाळेजवळ, बौद्धवस्ती, सिद्धार्थनगर ता.जि.अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्या पाचजणांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एम.के बेंडकोळी, सफौ कैलास सोनार, पोना राहुल द्वारके, पोकाँ रमेश दरेकर, पोकाँ अमोल आव्हाड, पोकाँ सुधाकर पाटोळे, पोकाँ महादेव निमसे, पोकाँ अविनाश कराळे, चापोकाँ संजय काळे, चापोकाँ भागचंद लगड, चापोकाँ अरूण मोरे, होमगार्ड भागवत केदार, होमगार्ड वैभव सुसे आदिंच्या ‘टिम’ने कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.८ ऑगस्ट २०२२ ला देवदरी गावच्या ग्रामसभेत ग्रामसभा घेऊन त्यामध्ये देवदरी रिसॉर्ट हॉटेलचे नोंद लावून ग्रामपंचायत कर भरण्यासाठी ठराव घेण्यात आलेला होता. त्याबाबत देवदरी ग्रामसेवक यांनी रिसॉर्टचे मालक विठ्ठल तुकाराम वामन यांना नोटीस बजावणी केली. त्यावेळी विठ्ठल वामन याने ग्रामसेवक याने अरविंद शेळके यांच्याजवळ यातील जखमीस जिवे मारण्याची धमकी दिली. दि.१७ ऑगस्ट २०२२ ला जखमी संभाजी शिवाजी वामन ( रा. देवगाव ता. जि. अहमदनगर) हे काम करीत असलेल्या राजीव गांधी पतसंस्था, (दिल्लीगेट शाखा, अहमदनगर) येथून त्यांच्याकडील बजाज कंपनीची डिस्कवर दुचाकीवरून जात असताना पाठीमागून मोपेड गाडीवर अनोळखी तिघेजण आले, त्यांनी संभाजी वामन यांना आडवून त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यांनी वामन यांना हातापायांवर मारून त्यांचे दोन्ही पाय व एक हात फॅक्चर करून झालेल्या झटापटीत वामन यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व खिश्यातील १० हजार रुपये गहाळ झाले आहेत. गर्दी जमा होऊ लागल्याने ते पळून गेले, याबाबतच्या संभाजी शिवाजी वामन यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं ३५८/२०२२ भादवि कलम ३०७, ३२६, ३२४, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ सह आर्म ॲक्ट ४/२५,३/२५ प्रमाणे दि.२१ ऑगस्ट २०२२ रोजी जखमी वामन यांच्या दवाखान्यातील जबाबवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वी अविनाश बाळासाहेब ठोंबरे (रा. सिद्धार्थनगर, बौद्धवस्ती समाज मंदिरजवळ, खिश्चन कब्रस्तान, अहमदनगर) यास अटक करण्यात आली होती. तसेच गुन्हा घडल्यापासून विठ्ठल तुकाराम वामन, नानासाहेब उर्फ नानाभाऊ बबन वामन, विर दिपक सोनवणे, राहुल उर्फ बंडू उत्तम घोरपडे, कृष्णा उर्फ बच्चू सखाराम काते ही सर्वजण फरार होती. या सर्वांना दि.२२ डिसेंबरला भिंगार परिसरात अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास केला असता यातील विठ्ठल तुकाराम वामन याने बाकी सर्वांना ५० हजार रूपयांची सुपारी दिल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या पाच जणांना न्यायालायसमोर हजर केले असता, त्यांना प्रथम ४ दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली. त्यानंतर दि.२६ डिसेंबरला गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी न्यायालयाने आणखी २ दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला आहे.
गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पीओ गाडी व दुचाकी या गुन्हयाचे तपासकामी जप्त केल्या. गुन्ह्याचा अधिक तपास एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एम के बेंडकोळी हे करीत आहेत.