सुतारवाडी कापरी नदीपात्रातील वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पारनेर : तालुक्यातील सुतारवाडी येथून कापरी नदीपात्रातील वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करुन ५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई ‘नगर एलसीबी’ने केली आहे.
एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन, उपसा व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या आदेशान्वये पोनि श्री. आहेर यांनी दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी नगर एलसीबीचे पोना संदीप दरंदले, पोकाॅ भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, विशाल तनपुरे या पोलीस अंमलदारांना अवैध वाळू उत्खनन, उपसा व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्यासाठी रवाना केले. अंमलदार पारनेर परिसरात अवैध वाळू उत्खनन, उपसाबाबत माहिती काढत असताना एलसीबी टिम’ला माहिती मिळाली की, सलीम ऊर्फ भेव्या शेख (रा. नांदगांव, ता. नगर हा सुतारवाडी, ता. पारनेर) शिवारातील कापरी नदी पात्रातून बोटीच्या सहाय्याने नदीतील शासकीय वाळूचा चोरुन उपसा करुन ऋषीकेश सांगळे याच्या पांढरे रंगाचे डेपरमध्ये भरुन अवैधरित्या वाहतूक करत आहे. आता गेल्यास मिळून येईल. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी लागलीच पंचाना सोबत घेऊन माहिती ठिकाणी कापरी नदीपात्राचे कडेला जावुन पहाणी करता कापरी नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने नदीपात्रातील शासकीय वाळू उपसा करुन, बोटीतील पाईपच्या सहाय्याने पांढरे रंगाचे डंपरमध्ये वाळू भरतांना दिसले. पोलिसांनि खात्री होताच अचानक छापा टाकला असता नदीपात्रातील बोटीतील एकास पोलीस पथकाची चाहुल लागताच ते बोट नदीपात्रातील पाण्यात घेऊन निघून गेला. डंपर चालक व त्याचा एक साथीदाराने ढवळपुरी ते वनकुटे जाणारे रोडवर ताब्यातील ढंपर भरधाव वेगात चालवून वनकुटे शिवारातील दिवाजी वारे यांच्या वस्तीवर उभा करुन बॅपरमधील वाळू खाली केली. त्यावेळी पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्यांना पोलीसांची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सचिन शिवाजी मोरे (वय २१. रा. ढवळपुरी, ता. पारनेर – ढंपर चालक), ऋषीकेश ऊर्फ बबलु राजु सांगळे (वय २२. रा. सुतारवाडी, ता. पारनेर -ढंपर मालक) असे सांगितले. त्यांच्याकडे नदीपात्रातील बोटी कोणाचे मालकीची आहे अशी विचारणा करता त्यांनी नदीपत्रातील बोट ही फरार सलीम ऊर्फ भैय्या शेख (रा. नांदगांव, ता. नगर (फरार) यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकीची वाळू अवैधरित्या चोरी केल्याने आरोपींना ५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा पांढरे व राखाडी रंगाचा बंपर व ४० हजार रुपये किंमतीची ४ ब्रास वाळू असा मुद्देमालासह ताब्यात घेतला. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५७७/२०२४ भान्यासंक ३०३ (२), ३ (५) सह प.सं.का.क. ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई पारनेर पोलीस करीत आहे.