संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री कतरिना कपूर खान आज नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. दुसऱ्या डिलिव्हरीमुळे करिना काही वेळ बॉलिवूडपासून दूर होती. मात्रा आता कतरिना पून्हा जोरदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. अशातच ती एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर करिनावर बहिष्कार टाकण्याची मागणी युजर्स करतायतं तर ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड सुरु आहे.
यामागचे कारण म्हणेज करिना रामायण या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय होत आहे. या चित्रपटात करिना सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे यासाठी तिने तब्बल १२ कोटींचे मानधन मागितले आहे. परंतु इतर चित्रपटांच्या तुलनेत हे मानधन जास्त असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला आहे. या सर्व चर्चा रंगत असातानाच सोशल मीडियावर करिनाच्या नावाने #BoycottKareenaKhan हा ट्रेंड चालवला जात आहे. सीता ही एक पवित्र व्यक्तिरेखा असून हिंदू लोकांसाठी आदरस्थानी असल्याने सीतेची भूमिका साकारण्यासाठी करिनाची निवड करणे चुकीचे आहे. या भूमिकेसाठी एका हिंदूच अभिनेत्रीला घ्या असा मागणी संतापलेल्या नेटकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच #BoycottKareenaKhan ट्रेंड चालवत तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे.