सीएनजीपंप देण्याच्या बहाणाने फसवणुकीपैकी 7 लाख रु. फिर्यादीस परत मिळवून देण्यात अ.नगर सायबर पोलिसांना यश

सीएनजीपंप देण्याच्या बहाणाने ़फसवणुकीपैकी7 लाख रु. फिर्यादीस परत मिळवून देण्यात अ.नगर सायबर पोलिसांना यश
संग्राम सत्त्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः सीएनजी पंप देण्याचा बहाणा करून 15 लाख 45 हजार 500 रू. ची ऑनलाईन फसणूक केलेल्या रक्कमे पैकी 7 लाख 10 हजार 357 रूपये फिर्यादीस परत मिळवून देण्यात अहमदनगर सायबर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी अशिष गोविंद निलंगे (रा.अहमदनगर) यांना दि.11 ऑगस्ट 2023 ते दि.7 सप्टेेंबर 2023 दरम्यान यातील फिर्यादी यांना 9038836150 या मोबाईल नंबर धारक राजेश शुक्ला व 9046925323 सिध्दार्थ शुक्ला यांनी आदानी कंपनीचे अधिकारी असल्याचे बतावणी करून सीएनजी पंप देण्याचा बहाणा करून विविध बँकेच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांची एकूण 15 लाख 45 हजार 500 रू.रुपयांची फसवणूक केली आहे, या फिर्यादीवरून गुरंन 22/2023 भादवि 149,420 आयटी अ‍ॅक्ट 66 (डी) प्रमाणे गुन्हा नोेंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झालल्यानंतर एसपी राकेश ओला यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शानाखाली सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार सायबर पोलिस ठाण्याचे पोसई राहुल सानप, पोहेकॉ योगेश गोसावी, राहुल हुसळे, पोना अभिजीत अरकल यांनी तात्काळ फसवणूक झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. ज्या खात्यात फसवणूक झालेली रक्कम वर्ग घाली आहे. त्या बँकेशी संपर्क करून तात्काळ फसवणूक करणारे बँक खाते गोठवण्यात आले.त्यामध्ये 7 लाख 10 हजार 357 रुपये गोठवण्यात यश आले. त्यानंतर न्यायालयाकडून फसवणूक झालेली रक्कम 7 लाख 10 हजार 357 रूपये फिर्यादी यांना परत करण्याचे आदेश प्राप्त करून ती रक्कम फिर्यादी यांना परत करण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पेट्रोल पंप एजन्सी देतो, घर बसल्या जॉब देण्याचा बहाणा, ऑनलाईन केवायएसी अपडेट करणे अशा आमिषाला बळी पडू नये, प्रत्येकाने अनोळखी व्यक्तीशी अर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारे अर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईमकडे तक्रार करावी. पोर्टल हेल्पलाईन नंबर 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन एसपी राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, अहमदनगर सायबर पोलीस ठाण्यांने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!