श्री साईबाबांच्या दर्शनाने नवीन ऊर्जा व काम करण्याची प्रेरणा मिळत असून त्यांचा आशीर्वाद नक्की माझ्या पाठीशी आहे : सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर
सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी (कविता भराटे) : मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
साई दर्शनाने मन प्रसन्न होते. काम करायची नवीन ऊर्जा व स्फूर्ती बाबांच्या दर्शनामुळे मिळते.असे या वेळी तिने सांगितले.
साई दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.
रांगीला.मासूम. नरसिंव्हा.सत्या.जुदाई.या सारखे अनेक चित्रपट
उर्मिला मातोंडकर हिने बॉलिवूडला दिले आहेत. वयाच्या 3 ऱ्या वर्षी उर्मिला हिने मासूम. कुरबानी. बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली. 1991 मध्ये उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1995 मध्ये उर्मिला राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला सिनेमातही काम केले. एक प्रसिद्ध सिने अभिनेत्री असल्यामुळे व ती शिर्डीत आल्याचे समजताच तिच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उर्मिला मातोंडकर यांना उपस्थित साईभक्त, तसेच चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळत होते.