सावेडीत एकाच दिवशी २ ठिकाणी चैन स्नॅचिंग ; मोबाईल स्नॅचिंग करणारा नागरिकांनी पकडला

सावेडीत एकाच दिवशी २ ठिकाणी चैन स्नॅचिंग ; मोबाईल स्नॅचिंग करणारा नागरिकांनी पकडला
मार्केटयार्ड चौकात मोबाईल स्नॅचिंग, तर बस प्रवासात दागिन्यांची चोरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : नगर शहरातील अनेक ठिकाणी गेल्या २ दिवसांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावेडी उपनगरात एकाच दिवशी काही तासाच्या अंतराने दोन ठिकाणी रस्त्याने पायी जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून तोडून घेऊन पळून गेले. मार्केटयार्ड चौकात रस्त्याच्या बाजूला मोबाईलवर बोलत असणा-या व्यक्तीच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून चोरुन नेला तर बस प्रवासात म्हाता-याच्या बॅगमधून ११ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.

चैन स्नेचिंगची पहिली घटना भुतकरवाडी या भागात घडली. अंजली अनिल धोडपकर (वय ६५ रा. श्री हौसिंग सोसायटी, भूतकरवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी धोडमकर या शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी भुतकरवाडी परिसरातील महादेव मंदिरात दर्शन करण्यासाठी गेल्या होत्या. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ६.४५ च्या सुमारास त्या घरी पायी जात असताना दुचाकीवरून तोंडाला माल बांधलेले दोन इसम त्यांच्या जवळ आले. काही कवायच्या आत त्यांनी अंजली धोडकर यांच्या यातील ४५ हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने ओरबाडून मनमाड रस्त्यावरील दीपक पेट्रोल पंपाच्या दिशेने धूम ठोकली, याबाबत अंजली घोपकर यांनी शनिवारी (दि. २७) दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैन स्नेचिगची दुसरी घटना सावेडी उपनगरात पाईपलाईन सत्यावर त्याच दिवशी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. सुजाता राहुल अष्टेकर (वय ४५, रा. अमियानगर पाईपलाईन रोड) या नातीसाठी दुकानातून चॉकलेट आणण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीसोबत अमिकनगरकडून पाईपलाईन रोडकडे पायी चाललेल्या होत्या, त्यावेळी समोरून लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या दुचाकीवर दोघे अनोळखी आले. त्यातील मागे बसलेल्याने अष्टेकर यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमंतीचे मिनी गंठण हिसकावले व
तेथून जोराने पळून गेला. या घटनेबाबत अष्टेकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एकाच दिवशी अवघ्या काही तासाच्या अंतराने भूतकरवाडी व पाईपलाईनरोड या दोन्ही ठिकाणी झालेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेतील चोरटे एकच असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीकोनातून पोलीस तपास करत आहेत‌.
चेन स्नॅचिंगच्या २ घटना ताज्या असताना स्टेशन रस्त्यावर मार्केट यार्ड चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ मोबाईलवर बोलत असलेल्या मास्ती बबनराव पाटोळे (वय ५२, रा. पवार चाळ, बुरुडगाव रोड) यांच्या हातातील मोबाईल मोटारसायकलवर आलेल्या एका इसमाने हिराका मारून पळविल्याची घटना रविवारी (दि.२८) सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. दरुम्यान पाटोळे यांनी आरडाओरडा केल्यावर पळून जाणाऱ्या चोरट्याला परिसरातील नागरिकांनी पकडले. त्याचे नाव सुरज विजय शिंदे (वय २१, रा. मार्केट यार्ड, नगर) असे असून त्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी व्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बस प्रवासात ३ लाख ६८ हजारांचे दागिने चोरले पुण्याहून नगर मार्गे अकोला येथे जाण्यारराठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या वृद्धाच्या बॅगमधून ३ लाख ६८ हजार रुपये किमतीचे ११ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. २७) दुपारी घडली. याबाबत परमेश्वर गोकुळदास खंडेलवाल (रा. घोरपडी, पुणे) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खडेलवाल हे बस प्रवासात असताना शिरूरपर्यंत त्यांच्या बॅगमध्ये दागिने होते. बस नगरमध्ये पुणे बसस्थानक व तेथून तारकपूर बसस्थानक येथे थांबली. तेथून निघाल्यावर त्यांना बॅगमधून दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिरा दाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!