संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू, पानमसाला व गुटखा विक्रीसाठी बाळगणा-याविरुध्द अहमदनगर एलसीबी टिम’ने कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ९२ हजार ३०२ रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ संदीप पवार, दिनेश मोरे, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, सचिन आडबल, पोकॉ रणजित जाधव व विजय धनेधर आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.
एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशान्वये एलसीबी पोनि अनिल कटके यांनी एलसीबी टिम’ला बोलावून फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
पथक नगर शहर परिसरात फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि श्री. कटके यांना माहिती मिळाली की, अंकुश भापकर,( रा. समता नगर, सावेडी) हा सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगतो. आता गेल्यास मिळून येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री कटके यांनी ही माहिती टिम’ला सांगून पंचांना सोबत घेऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. एलसीबी टिम’ने पंचांना सोबत घेऊन माहितीतील ठिकाणी समतानगर येथे जाऊन संशयीताच्या राहत्या घराचा शोध घेऊन अचानक छापा टाकला. तेथे एकजण घरा समोरील पडवीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेली सुगंधी तंबाखू, पानमसाला व गुटखा कब्जात बाळगतांना दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अंकुश अविनाश भापकर (वय २८, रा. राजमाता कॉलनी, समता नगर, सावेडी, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटख्याबाबत विचारणा करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास पोलिस टाक्या दाखविताच त्याने सुगंधी तंबाखू व विविध कंपनीचा पानमसाला व गुटखा हा विक्री करणेसाठी आणला आहे, अशी माहिती दिली. त्यास सुगंधी तंबाखु व विविध कंपनीचा पानमसाला व गुटखा अशा एकूण १ लाख ९२ हजार ३०२ रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले. याप्रकरणी एलसीबीचे पोहेकॉ संदीप कचरु पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गु.र.नं. ९६/२३ भादविक १८८,२७२,२७३,३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई तोफखाना पोलिस करीत आहे.