सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षकदिन म्हणून साजरी करावी : सौ.मंगल भुजबळ

सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षकदिन म्हणून साजरी करावी : सौ.मंगल भुजबळ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भारतात स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री मुक्तीची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसुधारक, देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी त्या काळात चिखलगोळे अंगावर घेत महिलांना शिक्षण देऊन खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करून महिला सक्षमीकरण केले.
त्यामुळे दि.3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे धोरणं सरकारने केले पाहिजेत अशी मागणी राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी विभागच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिन महिला मुक्ती दिन म्हणून ओळखला जातो त्यामुळे महिला मुक्ती दिनाच्या सर्व महिला भगिनींना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी बोलताना भुजबळ म्हणाल्या की, समाजकंटकांच्या विरोधाला न जुमानता ,जीवाची पर्वा न करता,ज्योतिबांनी सुरू केलेल्या शाळेत पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीमाई गेल्या म्हणूनचं मुली शिकल्या व उत्तुंग भरारी घेऊ शकल्या .बहुजनांना, वंचितांना आणि स्त्रियांना समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी, अनिष्ट प्रथांविरोधात आवाज उठवून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी फुले दाम्पत्याने आपलं अवघं जीवन समर्पित केलं त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजेत ,फुले यांचे हे ऋण कायम स्मरणात ठेवून त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळवून देणं, हीच या समतेच्या उद्गात्यांना खरी आदरांजली ठरेल.
यावेळी रेखा नवले,आरती शिंदे,योगिता गोसावी ,पूजा सत्रे ,दीपाली जाधव ,सीमा लोखंडे ,आशा मगर ,श्वेता कांबळे,अंजली गोरे आदी महिला उपस्थित होत्या .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!