👉खडकेवाके ग्रामस्थांनी दिली सत्ता पुन्हा सचिन मुरादेंच्या हाती
👉साकुरी ग्रामपंचायत,जनसेवा मंडळाच्या मेघना दंडवते सरपंचपदी
👉रांजनखोल ग्रामपंचायत,शुभांगी ढोकचौळे सरपंचपदी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहाता – संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून सत्ताधारी जनसेवा व जनपरीवर्तन पॅनलने बाजी मारली. एक जागा वगळता सरपंचपदासह सर्व जागा जिंकत सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता स्थापन केली आहे.
ओमेश जपे पा. सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवडून आल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठा जल्लोष यावेळी केला. ओमेश जपे पा. कार्यकर्त्यांमध्ये पोहोचतच त्यांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे दृश्य दिसून आले. तसेच या निवडणुकीत चाणक्य म्हणून ज्यांनी भूमिका बजावली असे बाळासाहेब जपे यांना सुद्धा खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला गुलालाची उधळण अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष घोषणाबाजी या मुळे तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता…एरवी शांत स्वभाव असलेले बाळासाहेब जपे यांनी सुद्धा आज निवडणूक जिंकल्यानंतर मोठ्या आवाजात घोषणा देत जल्लोष व्यक्त केल्याचे दिसून आले.
खडके वाके येथे सत्ताधारी सचिन मुरादे यांच्या जनसेवा मंडळाला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या आहेत. सरपंच पदासह नऊ जागा सदस्यांनी पटकाविल्या आहेत. विरोधी जनसेवा परिवर्तन मंडळाला एकही जागा मिळाली नाही. सत्ताधारी गटाच्या संगीता सचिन मुरादे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
मतदारांनी आमच्या विकासाच्या जोरावर आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला असून मतदार राजाचे आभार सचिन मुरादे यांनी मानले आहेत खडके वाके ग्रामपंचायतीचा निकाल ऐकण्यासाठी जे उमेदवार आणि प्रतिनिधी राहाता तहसील कार्यालयात उपस्थित होते. त्यातील एका प्रतिनिधीने निकाल स्पष्ट झाल्यानंतर केंद्राच्या बाहेर येत विजयाचा आनंद साजरा करतांना केलेले नृत्य उपस्थितांचे तसेच बंदोबस्त कामी असलेल्या पोलिसांचे मनोरंजन करणारे ठरले. आगळ्या वेगळ्या पद्धतीने या कार्यकर्त्याने आपल्या गटाच्या विजयाचा आनंद साजरा केला.