संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहाता – तालुक्यातील सावळीविहीर बु येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावळीविहीर बु ग्रामपंचायत कार्यालय नजिकच्या छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राहाता कृषी बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान जय भवानी जय शिवाजी, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, या जयघोषणा दिल्या.
यावेळी शिडीचे पोनि गुलाबराव पाटील, राहाता पंचायत समितीचे ओमेश जपे, सरपंच सौ रूपालीताई आगलावे, उपसरपंच गणेश कापसे, गणेश आगलावे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गडकरी, राजेंद्र दुनबळे आदिंसह सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पूजन करून मानवंदना दिली छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला त्याच प्रमाणे सौमया विद्यालय,न्यू इंग्लिश स्कूल येथेही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करून शिवजयंती मोठ्या आंनदात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त येथे भगवे झेंडे भगवे पताका लावण्यात आल्या होत्या. भव्य रांगोळी काढण्यात आली होती. फटाक्यांची आतषबाजी व छत्रपतींचा जयजयकारांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सावळीविहीर बु येथील छोट्या मोठ्या सामाजिक संघटनांनी विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यामुळे परिसरात हा शिवजयंती उत्सवाने दुमदुमून गेला होता.