संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशीनिमित्त अनेक ठिकाणी पंढरपूरसाठी अनेक दिंड्या नगर मनमाड महामार्गाने पंढरपूरकडे विठुरायाचा नाम घोष करत मोठ्या भक्ती भावाने जात आहेत.
सावळविहीर येथेही दरवर्षीप्रमाणे कै. रामदास महाराज कैकाडी यांची मनमाड येथून पंढरपूर कडे जाणारी दिंडी रविवारी दुपारी आली असता तिचे सावळीविहीर ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. व दर्शन घेतले. दिंडी बरोबर असणाऱ्या रथातील श्री साई, श्री पांडुरंग व संत कैकाडी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करत सर्व वारकरी बंधूंना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भजन व पांडुरंगाचा जयजयकार यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.
यावेळी बाळासाहेब जपे, रमेश आगलावे, राजेंद्र आगलावे, बाबासाहेब जपे, विक्रम आगलावे, संतोष आगलावे, नाना जाधव ,पप्पू आगलावे ,किरण आगलावे, शरद गडकरी, संतोष पळसे, पद्माताई कापसे, बेबीताई सोनवणे, कामठे ताई,फाजगे ताई, सांगळे ताई, नानी दहिवाळ,
ढगे ताई, आदींसह सर्व महिला भजनी मंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी रामदास महाराज कैकाडी यांच्या आठवणींचे अनुभव सांगितले.
यावेळी सर्व वारकऱ्यांनी पुढच्या वर्षी परत येऊ असे आश्वासित करत व पांडुरंगाचा जयजयकार करत आपल्या दिंडीचे शिर्डी कडे प्रस्थान केले. दिंडीत वयस्कर महिला पुरुष मोठ्या संख्येने होते. या दिंडीतील आकर्षक रथ हा सर्वांचा आकर्षण ठरला .