सावरगाव येथील भगवानभक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी पाथर्डी तालुक्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे : अभय आव्हाड

सावरगाव येथील भगवानभक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी पाथर्डी तालुक्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे. – अभय आव्हाड
पाथर्डी तालुका दसरा मेळावा कृती समीतीची बैठक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली भगवानगड दसरा मेळाव्याची परंपरा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी समर्थपणे सुरु ठेवली आहे. यावर्षीचा दसरा मेळावा येत्या मंगळवार दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता संत भगवानबाबा यांची जन्मभूमी भगवानभक्ती गड सावरगाव (ता. पाटोदा जि. बीड ) येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्वच समाजातील भगवानबाबा भक्तांनी हाजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाथर्डी तालुका दसरा मेळावा कृती समीतीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले आहे.


दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दसऱ्याच्या दिवशी भगवानबाबा यांची जन्मभूमी सावरगाव येथे २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी पाथर्डी तालुका दसरा मेळावा कृती समीतीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, डॉ.मृत्युंजय गर्जे, धनंजय बडे, गोकुळ दौंड, अमोल गर्जे, संजय बडे, संजय किर्तने, मुकुंद गर्जे, राजेंद्र दगडखैर, नारायण पालवे, वामन किर्तने, प्रा. सुनिल पाखरे, नागनाथ गर्जे, राहुल कारखेले, पिराजी किर्तने परवेझ मणियार आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आव्हाड म्हणाले पाथर्डी शहर व तालुक्यातील सर्व समाजाच्या जनतेने लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात संत भगवानबाबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.प्रत्येक गावातील युवक वृद्ध महिला यांनी स्वंय स्फुर्तीने मेळाव्यास उपस्थित राहुन मेळावा यशस्वी करून पंकजाताई यांचे हात बळकट करावे.यावेळी कृती समीतीच्या सर्वच सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. मेळाव्याबाबत जनतेत जागृती करण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शहरात तसेच ग्रामीण भागात फलक लावण्यात यावेत, मेळाव्याचे फलक वेगवेगळे करण्याऐवजी पंकजाताई मुंडे यांच्या कार्यालयाकडून आलेल्या डिझाईनचा वापर करून एकाच प्रकारचे फलक लावावेत. तसेच सोशल मिडीयावर सुद्धा जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी असेही यावेळी ठरले.

पाथर्डी तालुक्यातील मुस्लिम समाज लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेल्या संत भगवानबाबांच्या दसरा मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी मोठ्या उपस्थित असतो. यावर्षी ही तालुक्यातील मुस्लिम समाज सावरगाव येथे दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने जाणार आहे…….
परवेज मणियार ( पंकजाताई मुंडे समर्थक )

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!