सारसनगर येथील संत भगवान बाबानगर येथे सप्ताहास प्रारंभ

संतांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले -प्रकाश भागानगरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
 अहमदनगर –
संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांचे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य राहिले आहे. समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी आपल्या प्रवचन, किर्तनातून केले. दरवर्षी त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनाने परिसरातील नागरिकांना एक पर्वणीच मिळत असते. विविध किर्तनकाराच्या किर्तनाचा लाभ नागरिकांना मिळत असल्याने त्यांचे मौलीक विचार हे जीवनाला दिशादर्शक ठरत आहेत. आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे  दरवर्षी या उत्सवाची व्याप्ती वाढत असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, ही समाधानकारक बाब आहे. या सप्ताहासाठी आपण सर्वोतोपरि सहकार्य करु, असे प्रतिपादन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.

संत भगवानबाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाचे उद्घाटन नगरसेवक प्रकाश भागानगरे व समता परिषद अध्यक्ष दत्ता जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी हभप अमोल महाराज जाधव, हभप हंडे महाराज, हभप प्रभाताई भोंग, रविंद्र महाराज आव्हाड, अरुण ढाकणे, गजानन ससाणे, हभप झुंबर आव्हाड, ज्ञानेश्वर खेडकर, पांडूरंग डोंगरे, अनिल पालवे, बबनराव घुले, भगवान आव्हाड, मच्छिंद्र दहिफळे, गोलांडे महाराज, बबन बडे, अंकुश जानराव, रामदास बडे, म्हतारदेव घुले, देवराम घुले, गणेश महाराज, नंदकिशोर शिक्रे, कराळे, चैतन्य घुले, आश्रुबा सांगळे, उद्धव ढाकणे, भैरु सानप, दादा कर्‍हाड आदि उपस्थित होते.
     यावेळी अमोल महाराज जाधव म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून नियमित या ठिकाणी या सप्ताहाचे आयोजन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आध्यात्मिका वाढण्यास मदत होत असून, ईश्वर प्राप्तीचे साधन पारायणातून मिळत आहे.
     याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या या सप्ताहांची नागरिकांना नेहमीच आस लागून राहत असते. या धार्मिक उत्सवामुळे परिसरातील वातावरण आध्यत्मिक होते. हा सप्ताह नियमित आयोजित व्हावा, यासाठी आपले कायम सहकार्य राहील.
     प्रारंभी मूर्तीपूजन, ध्वज पूजन, संत पूजन, प्रतिमा पूजन, ग्रंथ पूजन, विणा पूजन, दिपप्रज्वलन आदि  मान्यवरांच्या हस्ते झाले. दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन,हरिपाठ, हरिकिर्तन असे दिवसभरात कार्यक्रम होत आहेत. सप्ताह यशस्वीतेसाठी श्री संत भगवानबाबा भक्त मंडळ व सेवाभावी प्रतिष्ठान कार्यरत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!