संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः नगर शहरातील सारसनगर या भागातील राजश्री कॉलनी, शिवकुमार मार्केटसमोर झालेल्या खूनाच्या घटनेतील आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्याला अवघ्या काहीतासातच भिंगार कॅम्प पोलीसांनी पकडले. अशोक रघुनाथ घोलप असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार सफौ वराट, पोहेकॉ संदिप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले, अजय गव्हाणे, धर्मनाथ पालवे, पोकॉ अमोल आव्हाड, महादेव पवार, चापोकॉ संजय काळे आदींच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी (दि.8सप्टेेंबर2024) सकाळी 7.15 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास भानुदास यादव मिसाळ (वय 71) हे घरातून कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेले असता तेथे अशोक रघुनाथ घोलप, विमल रंगनाथ घोलप, संगिता रघुनाथ घोलप ही सर्व शिवकुमार मार्केटसमोर, राजश्री कॉलनी (सारसनगर, ता.जि. अहमदनगर) येथे घरासमोर येऊन अशोक घोलप याने हातात चाकू घेऊन भानुदास यादव मिसाळ यांना विनाकारण शिवीगाळ केल्याने भानुदास मिसाळ यांनी त्यास तू मला शिवीगाळ का करतो, असे विचारल्याचा राग येऊन त्याने हातातील चाकूने व लोखंडी रॉडने भानुदास मिसाळ यांना मारुन त्यांचा खून केला. लहु सुखदेव सानप व संतोष चंद्रकांत नवसुपे हे मध्ये सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर चाकूने गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन शिवीगाळ दमदाटी करुन पळून गेला.
या घटनेबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात सपोनि जगदीश मुलगीर यांना माहिती मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन गुन्ह्यातील आरोपी अशोक रघुनाथ घोलप यास आनंदधामरोडने पळत असतांना त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. विमल रंगनाथ घोलप, संगिता रघुनाथ घोलप (रा.राजेश्री कॉलनी, सारसनगर ता.जि.अहमदनगर) यांनाही त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.या घटनेतील आरोपी अशोक रघुनाथ घोलप, विमल रंगनाथ घोलप व संगिता रघुनाथ घोलप यांच्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं 679/2024 बी.एन.एस2023 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.